News

शेतकरी आपल्या काळ्या आईची सेवेत कुठलीच कमतरता भासू देत नाही मात्र शेतकऱ्याला त्यांचा उचित मोबदला मिळत नाही. शेतकरी राजाला अनेक आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अहोरात्र कष्ट करून देखील शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडते, याचेच एक उदाहरण समोर आले आहे

Updated on 11 December, 2021 12:38 PM IST

शेतकरी आपल्या काळ्या आईची सेवेत कुठलीच कमतरता भासू देत नाही मात्र शेतकऱ्याला त्यांचा उचित मोबदला मिळत नाही. शेतकरी राजाला अनेक आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अहोरात्र कष्ट करून देखील शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडते, याचेच एक उदाहरण समोर आले आहे

हिंगोली जिल्ह्यात. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील दुधाळा या गावातील विठ्ठल अमृतरावं पोले या शेतकरी राजाने माहेरी आलेल्या मुलीला कपडे करण्यासाठी पैसे नव्हते म्हणुन फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली. या घटनेने सर्व्याचे हृदय पिळवटून टाकले, यामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था पुन्हा एकदा जगासमोर उघड झाली आहे. सरकार ओरडून ओरडून जगाला सांगते की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्ष 2022 पर्यंत दुपटीने करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, पण या घोषणा फक्त सफेद कागद काळा करण्यापर्यंतच मर्यादित आहेत. वास्तव यापेक्षा पूर्णतः भिन्न आहे, बळीराजाचे उत्पन्न जर खरंच वाढले असते तर आर्थिक टंचाईपोटी शेतकऱ्यांनी आपला जीव का दिला असता. असा सवाल आता उभा राहिला आहे.

विठ्ठलरावच होते परिवाराचे सर्वस्व

विठ्ठलराव गेल्या काही दिवसापासून भीषण आर्थिक टंचाईचा सामना करत होते, त्यांच्याजवळ फक्त 20 गुंठे शेतजमीन आहे, ह्या एवढ्याशा क्षेत्रात शेती करून विठ्ठलराव आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह मोठ्या हालाखीने भागवत होते, पण गेल्या काही दिवसापासून शेतात पिकपाणी चांगले पिकत नव्हते

 त्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. पाच वर्षांपूर्वी विठ्ठलराव यांच्या तरणाबांड मुलाचे शेतात काम करताना फिट आल्याने निधन झाले होते, म्हणून परिवाराची सर्व जबाबदारी हि विठ्ठलराव यांच्याच खांद्यावर होती, त्यांना दोन मुली देखील आहेत, दोघा मुलींची लग्न झाली आहेत.

मुलीला दिवाळीसाठी कपडे घेण्याची होती इच्छा

मुलींचे लग्न विठ्ठलराव यांनी मोठ्या हालाखीत लावले होते, मुलींच्या लग्नासाठी त्यांनी सावकारी कर्ज घेतले होते, तेदेखील अद्याप फिटले नव्हते. मुलींचे लग्न हालाखीत लागले म्हणुन त्यांची इच्छा होती की यंदा मुलीला दिवाळीसाठी चांगले कपडे घ्यावे आणि 

तिची मोठ्या आनंदाने बोवाळणी करावी, पण आर्थिक टंचाईचा सामना करणारे विठ्ठलराव यांना ते शक्य झाले नाही, म्हणुन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि त्यांनी कापुस पिकासाठी वापरण्यात येणारे औषध सेवन केले, विठ्ठलराव ह्यांना नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, आठ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मावळली, एक शेतकरी बाप आपल्या मुलीला बोळवणी न करताच जग सोडून गेला आणि मागे एक प्रश्न उभा करता झाला की, जगाचा भरनपोषण करणारा जगाचा पोशिंदा, बळीराजा कधी स्वतःचे पालनपोषण करेल आणि कधी खरंच बळीचे राज्य येईल.

English Summary: bad news farmer suciede in dudhaala in hingoli district
Published on: 11 December 2021, 12:38 IST