News

कांद्याचे विक्रीदर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला 2200 ते 2600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. यावर्षी मात्र हे दर 500 ते 600 रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. यामुळे शेतकरी नाराज आहे.

Updated on 28 February, 2023 10:53 AM IST

कांद्याचे विक्रीदर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला 2200 ते 2600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. यावर्षी मात्र हे दर 500 ते 600 रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. यामुळे शेतकरी नाराज आहे.

असे असताना एका कांद्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. हा कांदा म्हणजे बाहुबली कांदा. पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमधील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी घेतलेल्या कांद्याच्या पीकात एक कांदा तब्बल पाऊण किलो वजनाचा आहे.

हा कांदा पाहण्यासाठी शिरगावे यांच्या शेतात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सांगलीच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मात्र कौतुक होत आहे. कारण कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्यामध्ये भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे एका कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो इतका भरत आहे.

आपला ऊस राहतोय की काय? भीतीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरूच, तोडणीला एकरी १० हजारांचा दर

सरासरी 700 ते 800 ग्रॅम इतक्या वजनाचा कांदा पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेतीत (Heavy Wait Onion in Sangli) पीकला आहे. यामुळे शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे.

असे असताना सध्या कांद्याचे दर पडले आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा पाणी आणत आहे. 500 किलो कांदा विकून हातात दोन रुपये हातात आल्याने कांदा उत्पादक शेतकरी भलताच अडचणीत आला आहे. त्यामुळे कांद्यावरून राजकारण देखील पेटले आहे.

रस्त्यावर मासेच मासे! वादळानंतर वातावरण बदललं, पडला चक्क माशांचा पाऊस, रस्त्यांवर माशांचा खच

केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे,कांदा निर्यातीबाबतचे सातत्याचे धरसोडीच्या धोरणामुळे आपले जागतिक कांदा ग्राहक दुखावले गेले आहे. आगामी काळात याबाबत योग्य सुधारणा करण्याची हामी देऊन या दुरावलेल्या ग्राहकांना पुन्हा एकदा आपलेसे करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या;
एका वेळेस 80 फळे आणि 80 वर्षांसाठी नफा, नारळाची शेती आहे खूपच फायदेशीर
शेतकऱ्यांना आज मिळणार पीएम किसान योजनेतील १३ वा हप्ता
अँपल बोर लागवडीपासून कोट्यवधी कमाई, अनेक शेतकरी झाले मालामाल..

English Summary: Baahubali onion Sangli becoming a topic of discussion! weight of a single onion
Published on: 28 February 2023, 10:50 IST