सध्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील चासकमान, कळमोडी, खडकवासला अशी धरणे भरली आहेत. काही धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांची पावसाची सरासरी ८६१.६ मिलिमीटर एवढी आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यांत ५१९.२ मिलिमीटर पाऊस पडला होता. सरासरी १०५ मिलिमीटर पाऊस पडला होता.
आतापर्यंत ३७२.३ मिलिमीटर म्हणजेच ७६ टक्के पाऊस पडला असला, तरी सरासरीच्या तुलनेत २४ टक्क्यांनी त्यात घट झाली असल्याचे स्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
ऑगस्टमध्ये पावसाचा अंदाज कसा असणार? पुढील दोन आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज आला समोर, जाणून घ्या...
अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे. तसेच काही धरणांतील पाणीसाठा फारसा वाढलेला नाही. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाण्याची मोठी टंचाई भासण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ३१ जुलैपर्यंत पश्चिम पट्ट्यात चांगलाच जोरदार पाऊस बरसला. पूर्व भागात पावसाचा जोर कमी आहे. बारामती, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगाम वाया गेल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचं डाेकं ठिकाणावर आणणार
शेतकऱ्यांनो शिमला मिरची शेती करणार असाल तर जाणून घ्या रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय
पूरग्रस्तांसाठी कंबर कसून उभे आहोत, स्वाभिमानी कडून मदतीचा हात..
Published on: 03 August 2023, 10:30 IST