News

नाशिकमधील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. याचे कारण म्हणजे नाशिक जिल्हा बँकेने (Nashik district central co-op bank ltd) 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार असून हे शेतकरी भूमिहीन होणार आहेत.

Updated on 07 January, 2023 12:53 PM IST

नाशिकमधील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. याचे कारण म्हणजे नाशिक जिल्हा बँकेने (Nashik district central co-op bank ltd) 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार असून हे शेतकरी भूमिहीन होणार आहेत.

शेतकऱ्यांना कर्जफेड करणं अशक्य असल्यामुळे बँकेनं या शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातले साधारणता 50 हजारापेक्षा जास्त शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. यामुळे या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. असे असताना या शेतकऱ्यांसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

यासाठी 16 जानेवारीला नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीनं नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली. यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे लवकरच समजेल.

हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्याच्या बाजारपेठेत पोहोचली, किमतीने तोडले सगळे रेकॉर्ड

सतत अवकाळी, कोरोना, पडलेले बाजार भाव यामुळं नाशिक जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहे. त्यात जिल्हा बँकेने आवाजावी व्याज लावून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. अनेक पट या बँकेने व्याज लावल्यामुळं शेतकऱ्यांची मुद्दल आणि व्याज हे जमिनीच्या किंमतीपेक्षा देखील जास्त झाले आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, 16 तारखेपर्यंत सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी लाखोच्या संख्येने बिऱ्हाड घेऊन मालेगाव येथे पालकमंत्र्यांच्या दारात बसतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Sugar Export: मुदतीअगोदर सर्व साखर निर्यात होणार, कारखानदारांनी घेतला वाढलेल्या साखर दराचा फायदा

या आंदोलनाची गावागावात जागृती सभा कृती समिती सोबत विविध पक्षातील नेते देखील घेत आहेत. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व कृती समिती यांनी पुढाकार घेतला आहे. यावरच शेतकऱ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो छोडना नही पकडे रहना...
आता सरकारी इमारती, शाळा शेणाने रंगवल्या जाणार, शेतकऱ्यांचा होणार थेट फायदा..
अनेक दिवस बंद असलेल्या भिमा पाटसचा पहिला हप्ता २५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

English Summary: Auction process outstanding farmers' land district bank, 50 thousand landless
Published on: 07 January 2023, 12:53 IST