News

Pm Kisan Sanman Nidhi Yojna: पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी पात्र देशभरातील सुमारे अकरा कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते (By the hands of Prime Minister Narendra Modi) या योजनेचा दहावा हप्ता बहाल करण्यात आला. राज्यातील देखील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे देण्यात आले आहेत. मात्र या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होताच शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर एक नवीनच संकट उभे झाले आहे. ते संकट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरून पैसे गायब होत आहेत (Money is disappearing from farmers' accounts). यासंदर्भात तर बिहार सरकारने शेतकऱ्यांसाठी चक्क एक ऍडव्हायझरीच (Advisory) जारी केली आहे. बिहार सरकारने शेतकऱ्यांना सांगितले की, कोणत्याही व्यक्तीने कॉल करून शेतकऱ्यांना ओटीपी साठी विचारले असता शेतकऱ्यांनी ओटीपी (One Time Password) अशा इसमांना देऊ नये.

Updated on 04 January, 2022 2:20 PM IST

त्याचं झालं असं की एक तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत आणि पैसे जमा होताच बिहार मध्ये काही फ्रॉड व्यक्ती सक्रीय झालेले दिसत आहेत. बिहार सरकार द्वारे सांगितले गेले की भोळेभाबडे शेतकऱ्यांना कॉल करून त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून ओटीपी प्राप्त केला जात आहे व शेतकऱ्यांची ऑनलाइन लूट (Online loot) होताना उघड झाले आहे. त्यामुळे बिहार सरकारने शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी कोणालाच द्यायचा नाही असे म्हटले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा प्रकार फक्त बिहारमध्येच घडतोय असं नाही, अनेक राज्यात या प्रकारच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. असे अज्ञात लोक शेतकऱ्यांना फोन करून त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपीची मागणी करतात. शिवाय असे लोक जर ओटीपी सांगितला नाही तर योजनेचे पैसे वापस घेतले जातील अशी धमकी देखील शेतकऱ्यांना देताना दिसत आहेत.

अशी केली जाते खात्यावरून पैशांची चोरी (stealing money from the account)

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकार शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या ओटीपी ची मागणी करत नाही. तसेच यासाठी सरकार कधीच शेतकऱ्यांना फोन करत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी, आपल्या एटीएमचा पिन, खाते क्रमांक, तीन अंकी सीव्हीव्ही कोड कोणासोबतच शेअर करायचा नाही.

यासंदर्भात सायबर एक्सपर्ट माहिती देताना सांगतात की (While giving information, cyber experts say that), ऑनलाईन ठगी करणारे जालसाज लोक ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या, अडाणी लोकांना एसएमएस करतात किंवा कॉल करतात, हा मेसेज बँकिंग व्यवहाराशी संबंधित असतो. अशा मेसेज मध्ये ठगी करणारे लोक सामान्य नागरिकांना मोबाईल वर प्राप्त झालेला ओटीपी, एटीएम पिन, खाते क्रमांक इत्यादी पर्सनल माहिती विचारतात. जर भोळ्याभाबड्या लोकांनी आपली पर्सनल माहिती अशा ठगी करणाऱ्या लोकांना दिली तर त्यांच्या खात्यावरून पैसे गायब होऊ शकतात. शेतकऱ्यांसोबत देखील असंच होत आहे, शेतकऱ्यांना दमदाटी करून असे ठगी करणारे लोक ओटीपी प्राप्त करून घेतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरून पैसे गायब करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना या गोष्टीपासून सावध राहण्याची गरज आहे.

English Summary: attention pm kisan yojnas money is disappearing from farmers bank account government alerting farmers
Published on: 04 January 2022, 02:20 IST