News

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १० हप्त्याला उशीर झाला असून तो नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे सांगण्यात आले होते. जे की नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून हा हप्ता राखला होता.

Updated on 02 January, 2022 6:25 PM IST

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १० हप्त्याला उशीर झाला असून तो नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे सांगण्यात आले होते. जे की नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून हा हप्ता राखला होता.

अगदी ठरल्याप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच १ जानेवारीला देशातील १० कोटी ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा करण्यात आला आहे. हा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १ लाख २४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ कोटी रुपये जमा केले आहेत. २०२२ या नवीन वर्षाच्या सुरुवातीसच हा निर्णय आल्याने आता वर्षभर या योजनांचा माध्यमातून शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणले आहेत.

म्हणून किसान सन्मान योजना लागू:-

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र सरकार नेहमी कोणत्या न कोणत्या योजना काढत असते हे करत असताना पंतप्रधान मोदी खेड्यातील कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना सर्व सुविधा मिळाव्या तसेच त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे असे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणले आहेत.शेतकऱ्यांची प्रगती तर देशाची आणि शेताची प्रगती होईल असे यावेळी सांगण्यात आले आहे. आपल्या देशात ८६ टक्के असे शेतकरी आहेत जे अल्पभूधारक शेतकरी आहेत.

1 कोटी ५ लाख शेतकरी घेणार या योजनेचा लाभ:-

केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबिवली आहे जे की या योजनेचा लाभ देशातील ११ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. मागील काही महिन्यांपूर्वी यामध्ये अनियमितता आढळून आल्याने जे शेतकरी कर भरतात त्यांच्याकडून ही रक्कम परत घेण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील १ कोटी ५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे त्याच अनुषंगाने २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे असे कृषी आयुक्त धीरज कुमार सांगतात.

English Summary: At the beginning of the year, the decision was made in the interest of the Center, 10 installments of Kisan Yojana were deposited and Rs
Published on: 02 January 2022, 03:10 IST