News

शेती करणे म्हणजे कोणाचेही काम नाही. शेतात दिवसरात्र उन्हात पावसात आणि थंडीत देखील काम करण्याची तयारी असेल तरच तो व्यक्ती शेती करू शकतो. अनेक तरुण यामध्ये मोठी शेती असून देखील शेती न करता कमी पगारावर नोकरी करतात. मात्र कोणी ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती जोमाने शेती करते असे म्हटले तर सुरुवातीला यावर विश्वास बसणार नाही.

Updated on 27 January, 2022 4:17 PM IST

शेती करणे म्हणजे कोणाचेही काम नाही. शेतात दिवसरात्र उन्हात पावसात आणि थंडीत देखील काम करण्याची तयारी असेल तरच तो व्यक्ती शेती करू शकतो. अनेक तरुण यामध्ये मोठी शेती असून देखील शेती न करता कमी पगारावर नोकरी करतात. मात्र कोणी ९० वर्षांपेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती जोमाने शेती करते असे म्हटले तर सुरुवातीला यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. वाघाळे (ता. शिरूर) येथील श्रीमती जयवंताबाई दत्तू शेळके या वयाच्या ९२व्या वर्षीही मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने आजही शेती पिकवत आहेत. यामुळे त्यांची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. त्यांचा कामाचा अंदाज आजही अनेकांना लाजवणारा आहे. तरुणांपुढे सध्या त्या एक आदर्श ठरत आहेत.

९२ वर्षाच्या जयवंताबाई या रात्रं-दिवस शेतामध्ये काम करत आहेत. त्यांच्या पतीचे १९७२ च्या दुष्काळात निधन झाले. असे असताना त्यांनी स्वतः शेतात काम केले. त्यांनी शेती पिकवण्याचा निर्णय घेतला आणि मुलांना मोठे शिक्षण देऊन शहरात पाठवले. त्या आजही शेतात काम करत आहेत. त्यांची मुले आज चांगल्या पगारावर काम करतात. असे असले तरी त्यांनी शहरात न जाता ९२व्या वर्षीही हातात काठी घेऊन त्या शेतात जातात आणि हातात खरुपे घेऊन खुरपताना दिसतात. अगदी सगळी कामे त्या करत असतात. गव्हाला पाणी देणे, खुरपण्याचे काम करत असतात. त्यांचे हे काम मोठ्या उत्साहात सुरु असते.

त्या नेहेमी सांगत असतात की, 'दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतीने दोन घास खाऊ घातले आहेत. आता तर शेती पाण्याखाली आली आहे. शेतामध्ये काम करताना मोठी उर्जा मिळते. हेच खऱया अर्थाने माझ्या आरोग्याचे गमक आहे. शेतीमध्ये काम करून मोठा आनंद मिळत आहे. कामे केले तरच आपले शरीर चांगले राहते, तसेच कोणतेही आजार होत नाहीत. काळ्या आईची सेवा केली तर कधीच तुम्हाला काय कमी पडणार नाही, असेही त्या सांगत असतात. रानात काम केल्याने आजारही जडत नाहीत. हे त्यांच्याकडे बघितले तर आपल्याला दिसून येईल.

तसेच शरीरात जीव आहे तोपर्यंत गावात राहून काळ्या आईची सेवा करत राहणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या गावातील इतर शेतकरी सांगतात की त्यांच्याकडे बघितले की आजही आम्हाला काम करण्याचे एक ऊर्जा तयार होते. अनेक तरुण केवळ नोकरी नोकरी करत फिरत असतात, मात्र जर शेतात व्यवस्थित कष्ट केले तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याच्या पिकांची देखील पंचक्रोशीत नेहेमी चर्चा असते.

English Summary: At the age of 92, Jayavantabai cultivates agriculture, setting an example for the younger generation.
Published on: 27 January 2022, 04:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)