महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठअंतर्गत असणाऱ्या सर्व कृषी पदवी विद्यार्थी सातव्या सत्रात प्रत्यक्ष शेतात जाउन मार्गदर्शन करीत असतात.ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्यागिक जोड (रावे) कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील गावात सहा महिने हा उपक्रम राबवयाचा असतो. त्या
अंतर्गतच कृषी महाविद्यालय अकोला (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला) च्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील शेलगाव या गावी बियाण्यांचे वर्गीकरण व त्याचे महत्त्व याबद्दल शेतकऱ्यांना माहितीपर मार्गदर्शन केले.शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेले सुधारीत वाणांचे बियाणे उत्तम गुणवत्तेचे,Scientifically produced seeds of improved varieties of better quality, उच्च दर्जाचे वाण, शुद्ध,
कोणतीही भेसळ नसलेले, वाणांचे मूळ गुणधर्म जसेच्या तसे दाखवणारे, कीड रोगमुक्त, ठरावीक टक्केवारी इतकी उगवण क्षमता या सगळ्यांची माहिती कृषी विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आली.यामध्ये कृषी संशोधन केंद्र, वाशिम चे डॉ. बी. डी.गीते सर, कृषी महाविद्यालय, अकोला (डॉ.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.एस.माने सर व सोबतच संबंधित विद्यार्थ्यांचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उज्जैनकर सर,डॉ. खंबलकर सर व डॉ. खाडे सर यांच्या मार्गदर्शनाने कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी कमलेश राठोड,अनंत कुमार वर्मा,
आदित्य गंगावणे, राम चांडक, उमेश वाघ आणि लक्ष्मण साहू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व सोबतच त्यांना हे पटवून दिले की बियाणे निवडताना ते काळजीपूर्वक निवडावे व ते शासनमान्य संस्थेकडून प्रमाणपत्रित केलेलेच असावे.शुद्ध बियाण्यांची ओळख कशाप्रकारे करावी व
त्यातून होणाऱ्या फसवेगिरी पासून स्वतःचे कसे रक्षण करावे यासाठी विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना बिजांच्या विविध रंगाच्या प्रमाणपत्रांबद्दल माहिती देण्यात आली ज्याद्वारे बियाण्यांचे वर्गीकरण करण्यात येते. याद्वारे भविष्यात शेतकऱ्यांना भेसळ मुक्त बियाणे ओळखता येणार.
Published on: 30 July 2022, 09:19 IST