News

नाशिक- केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री समाज प्रक्रिया उद्योग योजना 2020-21 ते 2024- 25 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबवण्याचे ठरवले आहे.

Updated on 31 December, 2021 9:25 AM IST

नाशिक- केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री समाज प्रक्रिया उद्योग योजना 2020-21 ते 2024- 25 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबवण्याचे ठरवले आहे.

त्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत असंघटित अन्नप्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे, शेतकरी उत्पादक संस्था तसेच स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वंकष मूल्यमापन विकास करण्यासाठी अर्थसहाय्य करणे अशा प्रमुख उद्देशासाठी 3 ते 18 जानेवारी दरम्यान कृषी प्रक्रिया उद्योगासकर्जमंजुरी पंधरवडा चे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकांनी या संधीचे सोने करावे व लाभ घेण्यासाठी प्रस्ताव द्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

 या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी एक एक उत्पादन या घटकात कांदा पिकाची निवड करण्यात आली आहे.यासंबंधीचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापासूनते बँकेतून कर्ज मंजुरी या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक सूक्ष्मप्रक्रिया उद्योग,इंक्युबॅशन सेंटर, पायाभूत सुविधा, ब्रॅण्डिंग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधनासाठी प्रशिक्षण संस्थांना प्रस्ताव सादर करावेत, अशा आशयाचे आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

या योजने अंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म  प्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्‍क्‍यांपर्यंत व जास्तीत जास्त दहा लाख या मर्यादेपर्यंत प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय असणार आहे.या योजनेत सध्या कार्यरत असलेले शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहायता गट, सूक्ष्म अन्नप्रक्रिया प्रकल्प तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडित प्रकल्पही पात्र राहणार आहेत.

 या योजनेची सविस्तर माहिती

http://pmfme.mofpl.gov.inएम आय एप्लीकेशन http://pmfme.mofpi.gov.in/mis/#loginया वेबसाईटवर योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. (संदर्भ- दिव्य मराठी)

English Summary: at 3 to 18 january organize agri processing fortnight for agriculture processing bussinesman
Published on: 31 December 2021, 09:25 IST