News

या चक्रीवादळाचे नाव असानी ठेवण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ राहणार आहे. कमी दाबाचा पट्टा २२ मार्चपर्यंत चक्रीवादळात परिवर्तित हाेणार आहे. यामुळे पुढील काही दिवस हा धोका असणार आहे.

Updated on 19 March, 2022 3:21 PM IST

शेतकऱ्यांवर सध्या एक झाले की एक अशी संकटे येत आहेत. असे असताना आता पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट आले आहे. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे चक्रीवादळाची शक्यता आहे. यामुळे देशातील बहुतांश भागात विशेषतः मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. हे चक्रीवादळ दक्षिण-पूर्व भागाकडे सरकणार आहे. त्यामुळे अंदमान आणि निकाेबारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी देखील सज्ज राहावे. सध्या अनेक पिके काढणीला आली आहेत. यामुळे शेतकरी काळजीत पडला आहे.

या वादळाचा परिणाम राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याशिवाय विदर्भ, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागातही तापमान वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

तसेच या भागात गारपीठ देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही तास महत्वाचे आहेत. या चक्रीवादळाचे नाव असानी ठेवण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ राहणार आहे. कमी दाबाचा पट्टा २२ मार्चपर्यंत चक्रीवादळात परिवर्तित हाेणार आहे. यामुळे पुढील काही दिवस हा धोका असणार आहे. कोरोना काळापासून शेतकरी अडचणीत सापडला असताना आता या वादळाचा जोर कसा असणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या;
दुबईला माल विकणाऱ्या शेतकऱ्यांची १ कोटींची फसवणूक, कार्यालयही गायब..
ठरलं!! आता मराठवाड्याच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न पश्चिम महाराष्ट्र मिटवणार, बैठकीत झाला मोठा निर्णय..
घोषणा फक्त विधानसभेत, शिवारात मात्र विजतोडणी सुरूच, सरकारच्या मानत नेमकं आहे तरी काय?

English Summary: 'asani' cyclone will increase farmers' tension, hailstorm and rain are likely in the state due to cyclone
Published on: 19 March 2022, 03:21 IST