News

मागील महिन्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा थेट परिणाम हा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बाजारपेठांवर झाला आहे. तालिबानी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर व्यापार उदीम पूर्णपणे ठप्प झाला आहे.

Updated on 19 September, 2021 10:08 AM IST

 मागील महिन्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये ज्या काही  घडामोडी घडल्या त्याचा थेट परिणाम हा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बाजारपेठांवर झाला आहे. तालिबानी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर व्यापार उदीम  पूर्णपणे ठप्प झाला आहे.

या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये केली जाणारी आयात व तेथून होणारी निर्यात ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे अफगाणिस्तानमधून च्या कुठल्या वस्तूंची निर्यात इतर देशांच्या बाजारपेठेत होत होती त्या वस्तूंचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

हिंग आणि अफगाणिस्तान संबंध

 आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये वापरले जाणारे हिंगदेखील अफगाणिस्तान मधून आयात केले जाते. त्यामुळे त्यातील घडामोडींचा परिणाम हा तेथील आयात ठप्प होण्यावर झाला त्यामुळे हिंगाचा होणारा पुरवठा थांबला आहे.

त्यामुळे हिंगाचे बाजार भाव प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.हिंगाची शेतीही अफगाणिस्तान  मध्ये फार मोठ्या प्रमाणात केले जाते. हामाल भारतात आणून त्यापासून हिंग  तयार होते.तसे पाहायला गेले तर आपल्याकडे कजाकिस्तान आणि उजवीकडे स्थान मधून देखील हिंग तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल आयात केला जातो परंतु कितीला आयात केल्या जाणाऱ्या मालावर 27 टक्के आयात शुल्क आकारले जाते. अफगाणिस्तानमधून होत असलेल्या कच्च्या मालावर कुठल्याही प्रकारचे शुल्क न होते. आता नऊ हजार रुपये दराने विकले जाणारे हिंग प्रति किलो 12 हजार रुपये विकले जात आहे.

 

हिंग कसे तयार केले जाते?

हिंगहे प्रामुख्याने वनस्पती पासून तयार होते.हिंगाची रोपे भारतामध्ये आणले  जातात व त्याची पावडर तयार केली जाते. खाण्यात वापरले जाणारे हिंगहे रोपांच्या मुळापासून तयार केले जाते.हिंग लावल्यानंतर चार ते पाच वर्षात हिंगाची रोप पूर्णपणे वाढते. एका रोपापासून साधारणतः अर्धा किलो हिंग मिळते.

English Summary: asafoetida related with afganisthan market impact
Published on: 19 September 2021, 10:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)