News

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सारख्या राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कांद्याऐवजी कापसात जास्त फायदा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी एमएसपीच्या दुप्पट भावात कापसाची विक्री केली.यामुळे यंदा कापसाची लागवड वाढणार असून नवीन विक्रम स्थापित होण्याची शक्यता आहे.

Updated on 18 July, 2022 9:04 PM IST

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सारख्या राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कांद्याऐवजी कापसात जास्त फायदा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी एमएसपीच्या दुप्पट भावात कापसाची विक्री केली.यामुळे यंदा कापसाची लागवड वाढणार असून नवीन विक्रम स्थापित होण्याची शक्यता आहे.

कापसाचं उत्पादन यावर्षी अपेक्षापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने 2021-22 साठी 323.63 लाख गाठी ऐवजी 315.32 लाख गाठी (1 गाठी - 170 किलो) राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान यावर्षी शेतकरी याच्या लागवडीवर लक्ष केंद्रीत करत आहे. म्हणजेच काय पुढील वर्षात कापूस उत्पादन वाढू शकते. या मागे अर्थकारण आहे, शेतकऱ्यांना इतर पिकांऐवजी कापासातून अधिक उत्पन्न मिळालं आहे.

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा या पिकापासून खूप काही अपेक्षा असतात. परंतु मागील वर्षी कापूस अधिक फायद्याचे पीक ठरले. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, चालू खरीप हंगाम 2022 मध्ये देशातील कापाची स्थिती वाढून 4 ते 6 टक्के वाढून 125 लाख हेक्टर होण्याचा अंदाज आहे. 15 जुलै 2022 पर्यंत देशभरात कापसाची लागवड 102.8 लाख हेक्टरमध्ये झाली आहे. जे मागील वर्षाच्या तुलनत 6.2 टक्के अधिक आहे. वर्ष 2021 मध्ये 15 जुलैपर्यंत 96.58 लाख हेक्टरमध्ये कापसाची पेरणी झाली होती.

 

कोणत्या देशात किती कमी होईल कापसाचं उत्पादन

युनायटेड स्टेट डिपार्टंमेट ऑफ एग्रीकल्चरच्या अहवालानुसार, 2020-21च्या दरम्यान चीनमध्ये 6.42 मिलियन मिट्रिक टन कापासचं उत्पादन झालं होतं. जे कमी होत 2021-22 मध्ये 5.88 एमएमटी राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच उत्पादनात रिकॉर्ड 8.5 टक्क्यांनी कमी आहे. चीन जगातील इतर देशांपेक्षा जास्त कापासचं आयात करणार देश आहे. भारतात कापसाचे उत्पादन 7.6 टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. येथे 2020-21 मध्ये एमएमटी उत्पादन झालं होतं. तर 2021-22 मध्ये 5.55 एमएमटी उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : गोगलगायीने वाढवले शेतकऱ्यांचे टेन्शन; पाहणी करण्यासाठी माजी मंत्री थेट शेतीबांधावर

मागणीत घसरण

उत्पादन कमी होण्यासह मागणीही कमी होणार आहे. ओरिगो-ई-बाजारचे सहाय्यक जनरल मॅनेजर तरुण सत्संगीनुसार, चढ्या भाव आणि पुरवठ्याच्या अभाव ामुळे कापासाच्या मागणी घसरण होईल. पुरवठ्याचा अभाव कमी असल्यानं मे 2022च्या सुरुवातीस भारतातील कापसाचं भाव 50.330 रुपये प्रति गाठी असेल.

English Summary: As white gold has a tremendous price, Baliraja will cultivate cotton possibility of record
Published on: 18 July 2022, 08:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)