News

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात, असे असताना त्यांच्यापर्यंत मात्र सगळ्याच योजना पोहोचत नाहीत. यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचीत राहतात. तसेच वेळ निघून गेल्यावर शेतकरी जागे होतात.

Updated on 03 March, 2022 11:44 AM IST

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात, असे असताना त्यांच्यापर्यंत मात्र सगळ्याच योजना पोहोचत नाहीत. यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचीत राहतात. तसेच वेळ निघून गेल्यावर शेतकरी जागे होतात. आता खरीप हंगामात (E-Pik Pahani) ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी (Crop Register) पिकांची नोंद केली पण (Rabi Season) रब्बी हंगामात या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले होते. याबाबत अनेकांना माहिती देखील नव्हती. आता हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणीच्या दरम्यान शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

पीक पेऱ्याची नोंदणी असली तरच हरभऱ्याला आधारभूत किंमतीचा लाभ मिळणार आहे. नाहीतर खुल्या बाजारपेठेत विक्री करावी लागणार आहे. पण खुल्या बाजारपेठेतील आणि हमीभाव खरेदी केंद्रावरील दरात तब्बल 700 ते 800 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे याठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे आता काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. सध्या हरभऱ्याला किमान 5 हजार 230 एवढा दर मिळावा म्हणून राज्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. असे असताना नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, पण तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानेही नोंदणी होऊ शकलेली नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तसेच याबाबत औरंगाबाद जिल्ह्यातील एका खरेदी केंद्रावर तर एकाच शेतकऱ्याची नोंदणी झाल्याचे कृषी अधिकाऱ्याने सांगितले आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील खरेदी केंद्राची हीच परिस्थिती आहे. खरेदी केंद्रावर हरभरा नोंदणीसाठी अजूनही मुदत असली तरी त्याचा ऑनलाईन पीकपेरा असणे गरजेचे आहे. अन्यथा हरभऱ्याची विक्री शक्य नाही. यामुळे आता काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याबाबत हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी करायची असली तरी संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाईन पिकपेरा, पासबुक, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. पण अनेक ठिकाणी ‘ई-पीक पाहणी’ अँप हे सुरळीत चालले नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. ऑनलाईन पीकपेरा अपडेट मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंदणीच झालेली नाही. यामुळे आता शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे.

English Summary: As time goes by, farmers wake up, now farmers will be deprived of basic price?
Published on: 03 March 2022, 11:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)