News

शेतकऱ्यांची एकजूट असली की सर्व काही होते हे आपल्याला कृषी कायदे मागे घेताना समजले. सध्या अशीच एकजूट द्राक्ष बागायतदारांची दिसून आलेली आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच उत्पादनावरील खर्च आणि दिवसेंदिवस घटत असलेले दर यामुळे आता द्राक्षे उत्पादक जे दर ठरवतील तेच दर निश्चित केले जाणार आहे अशी महत्वाची भूमिका द्राक्ष बागायतदारांनी घेतलेली आहे.

Updated on 18 December, 2021 4:53 PM IST

शेतकऱ्यांची एकजूट असली की सर्व काही होते हे आपल्याला कृषी कायदे मागे घेताना समजले. सध्या अशीच एकजूट द्राक्ष बागायतदारांची दिसून आलेली आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच उत्पादनावरील खर्च आणि दिवसेंदिवस घटत असलेले दर यामुळे आता द्राक्षे उत्पादक जे दर ठरवतील तेच दर निश्चित केले जाणार आहे अशी महत्वाची भूमिका द्राक्ष बागायतदारांनी घेतलेली आहे.

 

आता पर्यंत या निर्णयावर अनेक बैठकी पार पडल्या पण आता शनिवारी दर निश्चित करण्याबाबत अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये द्राक्षाच्या दराबाबत अंतिम निर्णय झाला तर याचा परिणाम इतर पीक पद्धतीवर सुद्धा होणार आहे.

द्राक्ष बागायत संघावर ही वेळ का आली?

दरवर्षी अवकाळी पाऊसामुळे द्राक्षे बागायतदारांचे नुकसान होते परिणामी शासन अनुदान सुद्धा देत नाही जे की क्रॉप कव्हरसाठी अनुदान दिले जाते. शेतकरी दरवर्षी अनुदानाबद्धल मागणी करत आहेत मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुसऱ्या बाजूस निर्यातीवरील शुल्क तसेच द्राक्षे पॅकिंग साठी जो होणार खर्च आहे तो उत्पादकांवर लादला जात आहे जो की हा खर्च ग्राहक किंवा बाजारामधून काढण्यासाठी द्राक्षे उत्पादक सांगत आहेत. यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नसल्यामुळे मागील दोन दिवसापासून यावर बैठका पार पडत आहेत.

एका निर्णयाचा परिणाम अनेक घटकांवर...

एकदा की द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी दर निश्चित केला तर येणाऱ्या काळात फळ उत्पादक शेतकरी सुदधा असा निर्णय घेऊ शकतात. दर ठरवताना उत्पादनावर झालेल्या खर्चाचा विचार केला जाईल. पण एकदा को दर ठरले तर खालच्या दराने कोणतेही फळ असो अथवा पीक विकत येणार नाही.

काय आहे बागायतदार संघाचे अवाहन...

हा निर्णय फक्त १०० - २०० शेतकरी मार्फत होणार नाही तर सुमारे हजारो द्राक्षे उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीने हा निर्णय होईल. हा निर्णय होणार संपूर्णपणे अभ्यास होणार आहे. या बैठकीत प्रत्येक शेतकरी आपली मते मांडणार आहे. शनिवारी द्राक्ष भवन मध्ये शेतकऱ्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले आहे. त्यामुळे नक्की निर्णय काय होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English Summary: As soon as the central government repealed the agricultural laws, the grape growers united
Published on: 18 December 2021, 04:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)