News

केशर खूप महाग विकले जाते आणि त्याची किंमत हजारोंच्या घरात जाते. केशरचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर औषधे बनवण्यासाठीही केला जातो. यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

Updated on 15 September, 2023 4:14 PM IST

संपूर्ण राज्यभरात काल महाराष्ट्रीय बेंदूर सणाचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक ठिकाणी हा सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. असे असताना यामध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील अमरावतीतील (Amravati) बेलोरा या त्यांच्या मूळ गावी जाऊन बेंदूर हा सण साजरा केला.

यावेळी बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी बैलजोडीची विधीवत पूजा देखील केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, जितकं सरकारने दिलं नाही तितकं बैलांनी दिलं', आधी सगळ्या गोष्टी या गाव खेड्यातून होत होत्या.

पण आता या सर्व गोष्टींवर मागील 50 ते 70 वर्षांपासून दरोडा टाकण्यात आला आहे. शेती ही शेतकऱ्यांसाठी नाही राहिली ती आता उद्योगपतींची झाली आहे. बैलाने शेतकऱ्यांना खूप काही दिलं आहे.

सध्याच्या यंत्राच्या युगामुळे बैलाचे काम खूप हलकं केले आहे. तसेच शेतकऱ्यांकडे काहीच राहिलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सगळं निसटून चालंल आहे. पण यावर उद्योगपती मात्र खूप आनंदीत झालाय.

शेतकऱ्यांचे जे होते ते उद्योगपतींच्या हातात गेले. नफ्यात येणारा शेतकरी यामुळे तोट्यात गेला, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. यामध्ये सरकार देखील कमी पडले असल्याचा दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जीवामृत बनवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? शेतकऱ्यांनो जाणून घ्या..

English Summary: As much as the government did not give, the bulls gave, Bachu Kadu's challenge to the government...
Published on: 15 September 2023, 04:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)