शेतकऱ्यांचा वारंवार संपर्क येणाऱ्या तलाठ्यांची महसूल विभागात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या एखाद्या कामासाठी सर्वसामान्यांना वारंवार महसूल कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र राज्यात आहे. यामध्ये तहसीलदार ६६ पदे, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची ५२३ पदे रिक्त आहेत. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांची जबाबदारी येऊन पडत आहे.
त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कामेही प्रलंबित राहत आहेत. त्यात नैसर्गिक आपत्ती आली की पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग प्रलंबित कामाचा ढीग वाढतच जातो. यामुळे अनेकांची कामे रखडली आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यूचा आकडा 11 वर, उन्हात कार्यक्रम घेतल्याने होतेय टीका
दरम्यान, तलाठी संवर्गातील ४,१२२ पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर अशा सर्व महसूल विभागातील ही रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत. मात्र पुढे काही झाले नाही.
शेतकऱ्यांनो आता जमीन मोजणी झाली अचूक आणि गतिमान, जाणून घ्या..
सध्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या विविध कामांना विलंब होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज..
भाजपचे बडे नेते दिल्लीत आणि अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, चर्चांना उधाण...
शेतकऱ्यांनो शेतीच्या अवजारांची अशा प्रकारे राख निगा आणि देखभाल..
Published on: 17 April 2023, 02:10 IST