अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गाव पाड्यांवरील अनेक घरांचे छप्पर उडून घरातील अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
नाशिकच्या पेठ तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले आहे. पोल्ट्री शेड कोसळल्याने त्याखाली दबून हजारो कोंबड्या मृत पावल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने अनेक गावांची दुर्दशा झाली आहे. पेठ तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला आहे.
तालुक्यातील घनशेत, कुळवंडी, आमलोन, शेवखंडी, अभेटी आदींसह बरडापाडा गावात अनेक घरांची दुर्दशा झाली आहे. याच पावसात बरडापाडा येथील तरुण शेतकऱ्यांने जीवतोड मेहनत घेऊन उभारलेली चार एकरवर उभारलेली पोल्ट्री फार्म जमीनदोस्त झाली आहे. जवळपास 13 हजारहून अधिक पक्षांचा वादळी वाऱ्यात मृत्यू झाला आहे.
एका तासात झालं होत्याच नव्हतं! एका तासात 25 लाखांचं नुकसान, शेतकऱ्यानं सांगितला थरार
बरडापाडा गावातील ज्ञानेश्वर भोये, मंगेश इंपाळ या होतकरू तरुणांनी गावाजवळ 2017 मध्ये ही पोल्ट्री फार्म उभारलेली होती. तेव्हापासून एक पोल्ट्रीनंतर दुसरी असं करत चार ठिकाणी शेड उभारून व्यवसायाला गती देण्याचे काम सुरू होतं. ज्ञानेश्वर भोये यांच्या फार्ममध्ये जवळपास नऊ हजारहुन अधिक पक्षी होते.
मधमाशीच्या डंकाची किंमत 70 लाख रुपये किलोपर्यंत, आता शेतकरी होणार मालामाल..
तसेच इंफाळ यांच्या फार्ममध्ये सुमारे 4500 पक्षी होते. यासाठी भोये बँकेकडून 14 लाख रुपयांचे लोन काढून ते उभारले होते. मात्र सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यात डोळ्यासमोर सगळा पोल्ट्री फार्म जमीनदोस्त झाला.
या पिकाचे तेल 20 हजार रुपये प्रति लिटर, दर चार महिन्यांत 1 लाखाची कमाई..
मुंबई डेंजर झोनमध्ये, महाराष्ट्रात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू..
शेतकऱ्यांनो उन्हाळ्यात पंजाब-हरियाणामधून गाय खरेदी करू नका, गाईंचा होतोय मृत्यू...
Published on: 13 April 2023, 11:27 IST