शेतकरी वर्गावर अनेक संकटे नेहमी येत असतात. जसे की खरीप हंगामात जास्त पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले तर बाजारामध्ये शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले.हे काय कमी आहे तो पर्यंत शेतीला जोडव्यवसाय म्हणून जो दुधव्यवसाय होता त्यामध्ये दुधाच्या किमती आता कमी करण्यात आलेल्या आहेत.
गाईच्या दुधाची किमंत २५ रुपये होती तीच आता २३ रुपये वर :
खासगी आणि सहकारी दूध संघाकडून गाईच्या दुधाची प्रति लिटर २ रुपये किमंत कमी करावी लागली आहे. मागील पाच महिन्यात पशुखाद्य ची किमंत डबल केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची हे लूट पाहता शेतकरी निराशा व्यक्त करत आहेत.दिवाळी च्या सनावर दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात असते तर दुधाच्या किमती दूध संघाने कमी केल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. डेरीवर गाईच्या दुधाची किमंत २५ रुपये होती तीच आता २३ रुपये वर आली आहे. म्हशीच्या दुधाची किमंत स्थिर आहे मात्र पशुखाद्य च्या किंमती वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
दराबाबत शासनाचा निर्णय काय आहे ?
शासनाने गाईच्या दुधाला २५ तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये देणे सांगितले आहे मात्र खासगी व सहकारी दूध संघाने या नियमाचे उल्लंघन केले आहे.दिवाळी मध्ये दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते तसेच दुधाचा पुरवठा सुद्धा चांगला होत असतो तरी सुद्धा संघाने दुधाच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. अनेक दूध संस्था दरवर्षी सभासदांना लाभांश वाटतात मात्र यावेळी त्यांना सुद्धा कात्री लावलेली आहे.
दूधावर प्रक्रिया करुन अधिकच्या दराने विक्री:-
रोज राज्यात गाईच्या दुधाचे संकलन दोन कोटी होते त्यामध्ये ७० लाख लिटर दुधावर प्रक्रिया होते तर ३० लाख लिटर दुधाची पावडर आणि १ कोटी लिटर दुध पिशवीतून विक्री होते. सध्या विकले जाणारे गाईचे दुधावर अधिक प्रक्रियेचा भर होतो त्यामुळे थेट विकले जाणारे दुधावर खासगी संघ महत्व देत नाही.
Published on: 03 November 2021, 08:50 IST