News

आपल्याकडे जास्तीत जास्त हापूस आंब्याला मागणी असते आणि हापूस आंबा म्हणले की सर्वात पहिल्यांदा समोर जे चित्र येते ते म्हणजे कोकणच्या आंब्याचे. मात्र वाशी मार्केट मध्ये आफ्रिकन मलावी आंब्याची पहिली खेप सध्या दाखल झालेली आहे. प्रत्येक वर्षाचा जर आपण विचार केला तर कोकण भागातून एपीएमसी बाजारात असो किंवा देशातील इतर भागात असो कोकणातील आंबा विक्रीसाठी दाखल होत असतो.

Updated on 15 November, 2021 1:20 PM IST

आपल्याकडे जास्तीत जास्त हापूस आंब्याला मागणी असते आणि हापूस आंबा म्हणले की सर्वात  पहिल्यांदा  समोर  जे चित्र येते ते  म्हणजे  कोकणच्या  आंब्याचे. मात्र  वाशी  मार्केट  मध्ये आफ्रिकन मलावी आंब्याची पहिली खेप सध्या दाखल झालेली आहे. प्रत्येक वर्षाचा जर आपण विचार केला तर कोकण भागातून एपीएमसी बाजारात असो किंवा देशातील इतर भागात असो कोकणातील आंबा विक्रीसाठी दाखल होत असतो.

वाशीच्या एपीएमसी मार्केट मध्ये आफ्रिकेच्या मलावी आंब्याची पहिली खेप:

फक्त भारत देशातच न्हवे तर इतर देशात सुद्धा कोकणातील हापूस आंबा निर्यात केला जातो. आपला भारतीय हापूस आंबा अजून मार्केट मध्ये  दाखल  होण्यास  जवळपास तीन ते  चार महिन्याचा कालावधी लागणार आहे. यादरम्यान वाशीच्या एपीएमसी मार्केट मध्ये आफ्रिकेच्या मलावी आंब्याची पहिली खेप दाखल झालेली आहे.वाशी मध्ये जो आफ्रिकन मलावी आंबा दाखल झालेला आहे या आंब्याचे उत्पादन आफ्रिकामधील मलावी देशात घेतले जाते.

आपल्याकडे जशी कोकण मधील हापूस आंब्याला मागणी आहे जे की जसा आंब्याचा रंग, चव  आणि  सुंगध  असतो  त्याचप्रकारे आफ्रिकन मलावी आंब्याची  सुद्धा चव, सुगंध आणि  रंग आहे.मलावी मध्ये जवळपास ६०० एकर जमिनीवर  हापूस  आंब्याची  लागवड  करण्यात आलेली आहे. मागील दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे ४००००  हापूस  आंब्याच्या  काड्या मलावीकडे नेहण्यात आल्या होत्या. हापूस आंब्याला ज्या प्रकारे कोकण विभागात हवामान आहे त्याचप्रकारे मलावी मध्ये सुद्धा उष्ण व दमट प्रकारचे हवामान असल्याने तिथे घेऊन गेलेल्या हापूस आंब्याची झाडे सुद्धा चांगल्या प्रकारे वाढली आणि त्यास खूप प्रमाणत आंबे सुद्धा लागले आहेत.

हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे हवामान लाभले असल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले आणि याच परिणाम असल्यामुळे  वाशी  मधील  एपीएमसी मार्केट  मध्ये आफ्रिकन  हापूस आंबे आधीच तीन ते चार महिने दाखल झाले आहेत. या आफ्रिकन आंब्याची किमंत प्रति बॉक्स १२०० ते १५०० रुपये अशी आहे. एपीएमसी मार्केट मध्ये पहिल्या खेपेत जवळपास २७० पेट्या दाखल झालेल्या आहेत.

English Summary: Arrival of African Malawi Hapus Mango in APMC Market, India
Published on: 15 November 2021, 01:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)