News

रशिया आणि युक्रेन यांची युद्ध जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलींस्की यांचे नाव चर्चेत आहे. झेलींस्की हे कुठल्याही मदतीविना रशियाच्या विरोधात लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आसाम मधील कंपनीने अरोमिका टी कंपनीने विक्रांतच्या राष्ट्राध्यक्ष झेलींस्की यांच्या नावाने चहा सुरू केलाआहे

Updated on 20 March, 2022 8:08 PM IST

 रशिया आणि युक्रेन यांची युद्ध जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलींस्की यांचे नाव चर्चेत आहे. झेलींस्की हे कुठल्याही मदतीविना रशियाच्या विरोधात लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आसाम मधील कंपनीने अरोमिका टी कंपनीने विक्रांतच्या राष्ट्राध्यक्ष झेलींस्की यांच्या नावाने चहा सुरू केलाआहे

या कंपनीचे मालक रणजीत बरुवा यांनी याप्रकारे झेलेन्सकी यांचा सन्मानच केला आहे.

नक्की वाचा:हायड्रोजेल तंत्रज्ञान ठरेल शेतीमधील सिंचनाच्या व्यवस्थेतील एक उपयुक्त तंत्रज्ञान, वाचा या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर

याबाबतीत बरुआ यांनी म्हटले कीयुक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सामर्थ्याला, धैर्याला आणि संयमाला आम्ही सलाम करतो.रशियाच्या विरोधात विजय संपादन करणे त्यांच्यासाठी सोपे नाही तरीही त्यांनी लढा सुरु ठेवला. आसामच्या या चहाच्या कंपनीने खडक ब्लॅक टी चा नवीन गुणवत्तेला झेलींस्की चे नाव दिले आहे.

हा चहा ऑनलाइन देखील विकत घेता येणार असल्याचे बरुवा यांनी सांगितले. पुढे बरुवा म्हणाले की, सध्याची जागतिक परिस्थिती आहे यामध्ये झेलेंस्की यांच्यापेक्षा बलवान आणि कठोर कोणीही नाही.

नक्की वाचा:विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा: सोयाबीन, कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी तीन वर्षात एक हजार कोटींचा निधीची घोषणा

त्यांच्याप्रमाणेच हा चहा देखील एक मजबूत असा आहे. हा चहा कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या दहा पंधरा दिवसांमध्ये तो बऱ्याचशाई ई कॉमर्स साईट वर खरेदी करता येईल.याची 200 ग्राम पाकिटाचे किंमत 90 रुपये आहे.

बरुवा यांच्या मते त्यांच्या कंपनीमध्ये चाळीसहून अधिक दर्जेदार चहाचे प्रकार उपलब्ध असून यामध्ये त्यांच्या पेटंट केलेल्या भुत झोलोकिया चहा चा समावेश आहे. अरोमिका ती कंपनी ही आसाम मधील सर्वात मोठी चहा कंपनी आहे. या कंपनीकडे आज 32 पेक्षा जास्त प्रकारचे चहा आहेत.

English Summary: aromika tea company start zelensky tea in assam that asaam tea company
Published on: 20 March 2022, 08:08 IST