अनेकदा शेतकऱ्यांना रोपं खरेदी करताना किंवा बियाणे खरेदी करताना फसवले जाते. यामुळे त्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. असे असताना आता फळबाग लागवडीकरिता शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे व कलमांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने राज्यातील फळबागांची तपासणी सुरू केली आहे.
यामध्ये आतापर्यंत १०० रोपवाटिकांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. काही रोपवाटिकांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रोपवाटिकांची तपासणी करण्यासाठी प्रथमच मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी राज्यभर पथके नियुक्त करण्यात आली.
यामुळे आता रोपवाटिकेतून रोपं खरेदी करताना देखील फसवणूक होणार नाही ना? याची काळजी घेणे गरजेचे आहे. फलोत्पादनात राज्याची आघाडी असल्यामुळे रोपवाटिकांची संख्याही वाढते आहे. परंतु काही खासगी रोपवाटिकांच्या कामकाजाबाबत तक्रारीही वाढत आहेत.
दरम्यान, मान्यता रद्द केलेल्या सर्व रोपवाटिका खासगी आहेत. रोपवाटिकांमधील लागवड सामग्रीच्या दर्जाबाबत अनेकदा तक्रार होते. त्यामुळे तपासणी मोहीम राबवली गेली. यात निकृष्ट दर्जा असलेल्या १०० पेक्षा जास्त रोपवाटिकांची मान्यता काढून घेण्यात आली आहे.
राज्यात फळांचे रोपमळे अधिनियमन १९६९ मधील तरतुदींचा वापर करीत कृषी विभागाकडून या रोपवाटिकांच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची लागवड सामग्री मिळून फळबागांचे नुकसान होऊ नये यासाठी ही तपासणी अत्यावश्यक आहे.
मला न विचारता टोमॅटो का वापरले.? बायकोला आला राग आणि नवऱ्याला सोडून गेली माहेरी....
डाळींबाची कोण जात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, जाणून घ्या..
Published on: 15 July 2023, 02:24 IST