News

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कसतोडणी यंत्रास अनुदान योजना सन २०२३-२४ करिता दि.२१ एप्रिल पासून सुरूवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यामुळे ज्यांना लाभ घेयचा आहे त्यांनी अर्ज दाखल करावेत.

Updated on 19 April, 2023 10:11 AM IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उसतोडणी यंत्रास अनुदान योजना सन २०२३-२४ करिता दि.२१ एप्रिल पासून सुरूवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यामुळे ज्यांना लाभ घेयचा आहे त्यांनी अर्ज दाखल करावेत.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरची योजना कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. ऊस तोडणी ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक व्यावसाईक यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्दतीने ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करावेत.

राज्यतील महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त, शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका

संकेतस्थळ https://mahadbtmaharashtra.gov.in/Farmer/login/login हे महा डीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे अर्ज भराया. स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्जदार अर्ज करू शकतील.

राज्यावर वादळी पावसाचे सावट कायम, शेतकऱ्यांनो पुढील काही दिवस काळजी घ्या..

अर्जदार नोंदणी अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव (User Name) व संकेत शब्द (Password) तयार करून नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर पुन्हा लॉग-इन करून त्यांचे प्रोफाईल तयार करावे. 

शेतकऱ्यांना दिलासा! आता केंद्रानंतर राज्य सरकार देखील देणार 2 हजार रुपये
पाकिस्तानमध्ये पेट्राेल २८२ रुपये लीटर, देशात मोठे आर्थिक संकट
जगातील सर्वात महागडा आंबा, किंमत आहे 3 लाख रुपये प्रति किलो..

English Summary: Apply online for sugarcane harvester subsidy, starting from 21st April
Published on: 19 April 2023, 10:11 IST