आपण जर कृषी क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये नोकरी संधी चालून आली आहे. भारतीय कृषी कंपनीला एआयईसी (AIC) या नावानेही ओळखले जाते. या संस्थेत प्रशिक्षणार्थी व्यवस्थापकाच्या जागेसाठी भरती निघाली आहे. कंपनीने या नोकरी विषयी अधिकृत सुचनाही जाहीर केली आहे. जे उमेदवार या नोकरीसाठी इच्छुक आहेत. ते खालील दिलेली माहिती वाचून अर्ज करु शकतात.
पदाचा तपशील
पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक (MT)
नोकरीचे ठिकाण - नवी दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२०
नोकरीचा कालवधी - पुर्णकाळ(Full time)
पदांची संख्या आठ
(Education Eligibility) शैक्षणिक योग्यता
रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस / जिओ-इन्फॉरमॅटिक्स / स्थानिक माहिती तंत्रज्ञान विद्यापीठातून पदव्युत्तर असावे. आणि एमएससी भौतिकशास्त्र / कृषी / भूशास्त्र / भूगोल / सांख्यिकी / वनीकरण किंवा सिव्हिल अभियांत्रिकी / कृषी अभियांत्रिकी / बी.टेक / बीई असणे आवश्यक आहे. माहिती / पर्यावरण अभियांत्रिकीत ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. (एससी /एसटी साठी ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे). कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / पदवी / पदव्युत्तर शिक्षणात किमान 55 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(Monthly Salary) मासिक वेतन
या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन ४० हजार ते ४२ हजार ५०० रुपये दर महा असे निश्चित असेल.
(Age Limit) वयाची मर्यादा
या पदासाठी उमेदवाराचे वय ३५ वर्ष असावे.
(Selection Process) निवड प्रक्रिया
या पदासाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होईल. (Face to Face interview )
Application process) अर्ज करण्याची प्रक्रिया
या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
त्यानंतर आपली जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा मॅट्रिक प्रमाणपत्रची छायाचित्र जोडा आणि आपली संपूर्ण माहिती भरा.
त्यानंतर अर्जाच्या उजव्या बाजूला वरच्या जागेत पासपोर्ट आकारचा फोटो लावावा. नंतर आणि आपली स्वाक्षरी करावी लागेल.
शैक्षणिक योग्यता आणि अनुभवाचे इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची एक प्रत aicho@aicofindia.com वर पाठवा.
Published on: 20 April 2020, 04:23 IST