News

अमेरिका,कॅनडा, युरोपियन युनियन व अन्य देशांना निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळांच्या निर्यातीकरिता निर्यातक्षम फळबागांची ऑनलाइन प्रणाली अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आंबा फळबागा ची नोंदणीही मॅंगो नेट या ऑनलाइन प्रणालीवर तर डाळिंब फळबागाची नोंदणी ही अनार नेट या प्रणाली अंतर्गत करायचीआहे. या दोन्ही प्रणाली गुरुवार पासून कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Updated on 18 December, 2021 9:33 AM IST

अमेरिका,कॅनडा, युरोपियन युनियन व अन्य देशांना निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळांच्या निर्यातीकरिता निर्यातक्षम फळबागांची ऑनलाइन प्रणाली अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आंबा फळबागा ची नोंदणीही मॅंगो नेट या ऑनलाइन प्रणालीवर तर डाळिंब फळबागाचीनोंदणीही  अनार नेट या प्रणाली अंतर्गत करायचीआहे. या दोन्ही प्रणाली गुरुवार पासून कार्यान्वित करण्यात आले आहेत.

यासाठी कृषी विभागाने संपूर्ण राज्यातील आंबा व डाळिंब पिकाखालील क्षेत्र लक्षात घेऊन त्यांच्या निर्यातीला चालना मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबाग नोंदणी लक्षांक निश्चित केलेला आहे. 2020 ते 21 या वर्षामध्ये मॅंगो नेट  या ऑनलाईन प्रणाली अंतर्गत अकरा हजार 995 आंबा फळबागांची इतर अनार नेट या प्रणाली अंतर्गत 1518 डाळिंब फळबागा ची नोंदणी झालेली होती. यावर्षी निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची ऑनलाइन प्रणाली अंतर्गत नोंदणी करण्याकरता खास मोहीम राबविण्यात येत आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये देण्यात आलेल्यालक्ष नुसार निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेची मॅंगो नेट व अनार नेट या  प्रणालीअंतर्गत नोंदणी व तपासणी करण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. आंबा व डाळिंब फळबागांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अपेडा ने फार्म रजिस्ट्रेशन नावाची मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलेआहे.

त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त आंबा व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या बागांची नोंदणी करून घ्यावी.तसेच याबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ.. कैलास मोते यांनी केले आहे.

(संदर्भ-महाराष्ट्र लोकमंच)

English Summary: appeal to do registration of mango and pomegranet orchred for export
Published on: 18 December 2021, 09:33 IST