1. बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी 25 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 5 डिसेंबर 2018 अशी ठेवण्यात आली आहे.

अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसचे ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

सन 2017-18 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 25 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 27 नोव्हेंबर 2018 पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. तर उर्वरित पुरस्काराच्या अर्जदारांनी 5 डिसेंबर पूर्वी सादर करावी.

अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 16 ऑक्टोबर 2017,शासन शुद्धीपत्रक 8 डिसेंबर 2017 आणि शासन शुद्धीपत्रक 24 ऑक्टोबर 2018 चे अवलोकन करावे. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधावा असे, आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters