News

मुंबई: ‘सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन’ हा 6 महिन्यांचा प्रशिक्षण वर्ग वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे 1 जानेवारी 2019 पासून सुरू होत आहे. या प्रशिक्षणाला प्रवेशासाठी 24 डिसेंबर 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.

Updated on 17 December, 2018 1:05 PM IST


मुंबई:
‘सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन’ हा 6 महिन्यांचा प्रशिक्षण वर्ग वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे 1 जानेवारी 2019 पासून सुरू होत आहे. या प्रशिक्षणाला प्रवेशासाठी 24 डिसेंबर 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.

मत्स्यव्यवसाय विकास व विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना हे 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. सन 2018-19 या वर्षातील 121 वा प्रशिक्षण वर्ग 1 जानेवारी ते 30 जून 2019 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. प्रती प्रशिक्षणार्थी दरमहा 450 रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 100 रुपये शुल्क राहील.

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र प्रशिक्षणार्थींसाठी निकष:

  • प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा.
  • वय 18 ते 35 वर्षे या मर्यादेत.
  • पोहता येणे आवश्यक.
  • किमान इ. 4 थी उतीर्ण.
  • मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असावा.
  • प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक किंवा आधार कार्डधारक असावा.
  • विहित परिपूर्ण अर्ज व त्यावर संबंधित संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
  • संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्लीवर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई- 61 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

English Summary: Appeal to apply for Marine Fisheries Navigation Training up to December 24
Published on: 17 December 2018, 12:52 IST