अपोलो टायर्सने आज 6 मे 2022 रोजी चंदीगडमध्ये (Chandigarh) नवीन पिढीचे कृषी टायर्स लाँच केले. या वेळी उत्तर भारतातील शेतकरी आणि व्यावसायिक उपस्थित होते. नवीन अपोलो विराट टायर (Apollo virat tires) 20 लग्ससह अष्टपैलू उत्पादन म्हणून विकसित केले आहे. मऊ आणि कठोर मातीच्या परिस्थितीतही मजबूत पकड आणि दीर्घकाळ चालणारा टायर तयार केला आहे.
अपोलो टायर्सने ही नवीन 'विराट' श्रेणी सर्वात प्रगत अष्टपैलू ट्रॅक्टर टायर तयार केला आहे. इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्कृष्ट ट्रॅक्शन आणि अद्वितीय डिझाईन करण्यात आली आहे. कंपनी विशेषत: पंजाब, हरियाणा, यूपी, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, एपी आणि कर्नाटक यासारख्या मोठ्या कृषी-आधारित राज्यांवर लक्ष केंद्रित करणारा आहे. नवीन विराट श्रेणीचे व्हिज्युअल अपील नवीन काळातील ट्रॅक्टरच्या स्टायलिश डिझाईन्स आणि शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या सौंदर्यविषयक गरजांशी जुळते.
खूशखबर ! देशात 10 दिवस आगोदरच मान्सून धडकणार; यंदा लवकरच पावसाची शक्यता...
अपोलो विराट टायरची वैशिष्ट्ये
१. अपोलो विराट टायर्सचे नवीन डिझाइन करण्यात आली आहे.
२. ड्युअल टॅपर्ड लग डिझाइनमुळे टायरला पंक्चर होण्याची शक्यता कमी आहे.
३. नवीन ट्रॅक्टर मॉडेलला व्यवस्थित बसणार आहेत.
४. टायरचे आयुष्य जास्त राहण्यासाठी अधिक रबरचा वापर केला आहे.
५. घट्ट रेषा, टोकदार कडा आणि लग्जचे तितकेच वेगळे क्रॉस-सेक्शनल क्षेत्र, ठळक फॉन्टसह साइडवॉल डिझाइन आणि खांद्यावर ठळक क्रॉप नेमोनिक्स अपोलो विराट टायर्सला एक अद्वितीय सौंदर्यात्मक डिझाइन दिले गेले आहे.
Published on: 06 May 2022, 03:52 IST