देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ करण्याच्या उद्देशाने अपेडा नेहमी वेगळ्या प्रकारचे पाऊल उचलत असते. आता अपेडा ची शाखा बासमती निर्यात विकास फाउंडेशन यांनी बासमती तांदूळ ची निर्यात वाढवण्यासाठी बासमती तांदूळ ची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे.
शेतकऱ्यांना करीत आहे जागरूक
बासमती निर्यात विकास फाउंडेशनने उत्तर प्रदेश मधील तांदूळ निर्यात संघाच्या मदतीने उच्च गुणवत्ता असणाऱ्या बासमती तांदूळ लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश मधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या अंतर्गत जहांगिरपुर येथे एक जागृती अभियान सुरू केले आहे.
बासमती निर्यात विकास फाउंडेशन चे कार्य
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्ष या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव च्या राष्ट्रव्यापी उत्सवाचा एक हिस्सा म्हणून बासमती निर्यात विकास फाउंडेशन बासमती तांदुळाच्या शेतीत रासायनिक कीटकनाशक यांचा वापर करण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना जागृत करण्याच्या उद्देशाने एक अभियान चालवीत आहे. हे अभियान 16 जुलैला सुरू करण्यात आले होते.
या जागरूकता कार्यक्रमाच्या च्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागरूक करण्यात आली आहे की बासमती तांदूळ ची शेती हे भारतीय परंपरा आहे व या परंपरेला कायम ठेवणे ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. जागतिक बाजारपेठेत बासमती तांदळाची मागणी भरपूर आहे, त्याशिवाय शेतकऱ्यांना राज्याच्या कृषी विभागाद्वारे basmati.net वर रजिस्ट्रेशन करण्यासाठीसांगण्यात आले आहे.
पश्चिम उत्तर प्रदेश मधील जवळ जवळ 150 पेक्षा जास्त शेतकरी या जागृती अभियाना मध्ये झाले आहेत. तसेच या अभियानाच्या मध्ये शेतकऱ्यांना उच्च गुणवत्ता असणारे बासमती तांदुळाचे उत्पादन करण्यासाठी रसायन आणि खर्च यांचा ते प्रमाणात वापर करण्याचा सल्ला दिला गेला आहे कारण जागतिक बाजारपेठेत बासमतती तांदळाचे मागणी वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल.
भारताने 2020 ते 21 मध्ये 4.63 मिलियन टन बासमती तांदूळ केला निर्यात
अपेडाच्या मदतीने भारताने 2020 ते 21 व्या वर्षात 29149 करोड रुपये किमतीचा 4.63मिलियन टन बासमती तांदूळ निर्यात केला.अपेडा विविध माध्यमातून बासमती तांदळाची निर्यात वाढवण्यासाठी काम करीत आहे. भारत सरकारने अपेडाच्या नियंत्रणाखालीतांदूळ निर्यात संवर्धन फोरमची स्थापना केली आहे.
तांदूळ निर्यात संवर्धन फोरम काय आहे?
तांदूळ निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार द्वारा तांदूळ निर्यात संवर्धन फोरमची स्थापना केली गेली आहे. या फोरमची स्थापना अपेडाच्या नियंत्रणाखाली करण्यात आली आहे. त्याचा उद्देश आहे की तांदूळ उत्पादन आणि त्याची निर्यात यासंबंधी होणारे विकासावर नजर ठेवणे तसेच त्या संबंधीचे अनुमान निश्चित करण हे आहे.
Published on: 20 July 2021, 02:58 IST