News

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला. आता शेतकरी मोठ्या उमेदीने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.परंतु या रब्बी हंगामाच्या तोंडावर चिंता उत्पन्न करणारी बातमी आहे.

Updated on 02 November, 2021 10:26 AM IST

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला. आता शेतकरी  मोठ्या उमेदीने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.परंतु या रब्बी हंगामाच्या तोंडावर  चिंता उत्पन्न करणारी बातमी आहे.

भारतामध्ये डाय अमोनिअम फॉस्फेट म्हणजेच डीएपी आणि म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच एम ओ पि या खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

 जर या खतांचा मागच्या वर्षीच्या साठ्याचा विचार केला तर त्या तुलनेने यावर्षी केवळ एक तृतीयांश साठा उपलब्ध आहे. म्हणून या पार्श्वभूमीवर केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडवी यांनी शेतकऱ्यांना खतांचा साठा न करण्याचे आवाहन केलय. जर खत विभागाची आकडेवारी बघितली तर सध्या देशात 31 ऑक्‍टोबरपर्यंत डीएपी चा साठा 14.63 लाख टन इतका आहे.

हाचसाठा मागच्या वर्षी 44.95लाख टन होता. जर आपण मुरेटऑफ पोटॅश म्हणजेच एम ओ पी चा विचार केला तर ऑक्टोबर अखेर हा साठा 7.82 लाख टन इतका झालाय. मागच्या वर्षी हा साठा  21.70लाख टन इतका होता.

 परंतु जमेची बाजू म्हणजे डीएपी आणि एम ओ पी खताचा विचार बाजूला ठेवला तर बाकीचे खते जसे की युरिया, नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर सर्व  खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.

जरी युरियाचा  विचार केला तर मागच्या वर्षी 79.76लाख टन  इतका साठा होता. तसेच इतर एन पी के एस खतांचा साठा 38.40 लाख टन इतका असून मागच्या वर्षी हा साठा 38.40इतकाच होता.(स्त्रोत-लोकसत्ता)

English Summary: anxiaty news for farmer dap and mop fertilizer scarsity in india
Published on: 02 November 2021, 10:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)