देशातील नागरिकांच्या ओळखपत्र म्हणून आधार कार्डकडे पाहिले जाते. हे आधारकार्ड सर्व प्रकारच्या शासकीय कामांसाठी आवश्यक झाले आहे. पंरतु बऱ्याचवेळा आपल्याला आधार कार्डमध्ये सुधारणा करावी लागते. अशात युआयडीएआय म्हणजेच यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने लोकांसाठी एक नवी सुविधा आणली आहे.
या सुविधेमुळे कोणतेही बदल अगदी सोप्या पद्धतीने करता येतील. हे बदल आपण घरी बसूनही सहज करू शकणार आहोत..
चार राज्यात आधार कार्डचं फेसबुक पेज झाले सुरू
आधार कार्ड धारकांना सुविधा मिळावी यासाठी युआयडीएआयने चार राज्यांमध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये फेसबुक पेजची सुरुवात केली आहे. या पेजवरुन आधार कार्डविषयीचे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ शकतो. ही उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला मेसेज पाठवावा लागेल. दरम्यान फेसबुक पेजचं प्रादेशिक ऑफिस दिल्लीमध्ये असणार आहे. या बाबत युआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन माहिती दिली आहे.
दरम्यान युआयडीएआयच्या फेसबुक पेजवर जाण्यासाठी आपल्याला https://facebook.com/Aadhaar-RO-Delhi-103164305146104 वर क्लिक करावे लागेल. जर आपल्याला आधार कार्डसंबंधित काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आपल्याला या फेसबुक पेजवर मिळतील. दरम्यान फेसबुक पेज आधी चंदीगड, पंजाब, जम्मू-काश्मीर, हरियाणा, लद्दाख आणि हिमाचल प्रदेशात सुरू झालेले आहे.
Published on: 20 March 2021, 05:04 IST