News

यावर्षी राज्यात पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या महिन्यात काहीशी सुरुवात होत असताना पुन्हा एकदा फक्त आभाळ येत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या महिन्यात पावसाने दडी मारली होती.

Updated on 11 September, 2023 11:52 AM IST

यावर्षी राज्यात पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या महिन्यात काहीशी सुरुवात होत असताना पुन्हा एकदा फक्त आभाळ येत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या महिन्यात पावसाने दडी मारली होती.

नंतर सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे राज्यात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र अजून तरी सर्वत्र दमदार असा पाऊस होत नाही. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावली.

असे असताना कालपासून पुन्हा पावसाने एकदा विश्रांती घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र पूर्ण वर्ष काढण्यासाठी इतका पाऊस पुरेसा नाही. सध्या कोकणात, खानदेशात नाशिक, मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. 

आता पुन्हा एकदा पाऊस एक ते दोन दिवस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार नाही.

तसेच मंगळवारी राज्यभर पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी लावणार नाहीये.

बुधवारपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी याकडे लक्ष देऊन आहेत.

 

English Summary: Another break from rains, farmers are waiting for heavy rains, know this week's weather forecast...
Published on: 11 September 2023, 11:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)