News

वीज जोडणी तर सोडाच पण तोडणीच सुरु असल्याचे चित्र शेतशिवारात आहे. नांदेड जिल्ह्यात वीजजोडणी केली जात आहे तर दुसरीकडे (Jalna District) जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आदेश मिळाले नसल्याचे सांगत ही कारवाई सुरु आहे.

Updated on 19 March, 2022 11:54 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजतोडणी सुरु असताना ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेत वीजतोडणी थांबवण्याची घोषणा केली. तसेच ज्याची वीज तोडली आहे त्यांची वीज पुन्हा जोडून देण्याची घोषणा त्यांनी केली यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असताना मात्र आता प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. सध्या देखील शेतकऱ्याची वीज तोडली जात आहे. यामुळे सरकारच्या मानत नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

असे असताना यामुळे वीज जोडणी तर सोडाच पण तोडणीच सुरु असल्याचे चित्र शेतशिवारात आहे. नांदेड जिल्ह्यात वीजजोडणी केली जात आहे तर दुसरीकडे (Jalna District) जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये आदेश मिळाले नसल्याचे सांगत ही कारवाई सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यासाठी वीज तोडणीची मोहिम स्थगित करण्याचे सांगितले होते. मात्र स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी होत नाही.

यामुळे पुन्हा शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी नेते आणि अनेक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याअभावी (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान हे सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून याची झळ अनेक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे अगदी शेवटच्या बहारात आलेली पिके जळू लागली आहे.

यामुळे आर्थिक नुकसान होणार असून उत्पन्न घटणार आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील तब्बल 134 कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. सध्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला शेतकरी गेला तर अधिकारी देखील सलग सुट्यांमुळे कार्यालयात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना कोण वाली आहे का नाही असा प्रश्न पडत आहेत. यामुळे ऐन उन्हाळ्यात पिके जळू लागली आहेत.

सध्या लेखी आदेश मिळाले नसल्याचेही अधिकारी सांगत आहेत. यामुळे आता मंत्र्यांनी घोषणा करून देखील अधिकारी ऐकत नसतील तर परिस्थिती अवघड असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात हा प्रश्न अजूनच पेटणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता पुन्हा सरकार विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरणार आणि पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या;
आंबा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी!! पणन मंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय..
चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला समोर दिसला बिबट्या आणि.., थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण..
पुन्हा तोच तमाशा..!! तीन महिन्याची मुदत संपल्यावर पुन्हा शेतकऱ्याची वीज तोडणार?

English Summary: announcement Vidhan Sabha, Shivara, the power cut continues, what is the government's opinion?
Published on: 19 March 2022, 11:54 IST