आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रामदास आठवले यांनी आगामी 2024 लोकसभा निवडणुक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आता तयारी सुरू आहे. ते अहमदनगर दौऱ्यावर आले होते.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. यावेेळी निवडणूक जिंकणारच आहे. संधी मिळाल्यास संधीचे सोने करू, असेही ते म्हणाले. तसेच जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी, भाजप व शिंदे गटाची मागणी असेल, मी निवडून येण्याचे वातावरण असेल तर मी तेथून निवडणूक लढणार आहे.
भाजप व मित्रपक्षाने मला आग्रह केला तर मी निश्चित शिर्डीतून निवडणूक लढेल. 2009 साली त्यांचा याठिकाणी पराभव झाला होता. आता आठवले याठिकाणी दौरे करत आहेत. त्यांचा शिर्डी लोकसभा मतदार संघात सहा महिन्यात तिसरा दौरा आहे.
कोरोना वाढतोय! प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, वाचा आता नवीन नियम..
सध्या शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे खासदार आहेत. नगर आणि शिर्डीच्या विकासाच्या दृष्टीने या परिसरात एखादा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.
विनायक मेटेंच्या भाच्याच्या दाव्याने खळबळ! म्हणाले, तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच...
यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. येथे रस्ते चांगले आहेत. मात्र, काही ठिकाणी रस्ते खराब आहेत. त्यामुळे रस्ते सुधारण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पुढे काय होणार हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
राहुल, इथंपण तू मला अडवणार का? अजितदादांनी राहुल कुल यांना केला प्रश्न..
'शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान न देणारे भिकारी सरकार'
'गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी'
Published on: 19 August 2022, 09:16 IST