1. बातम्या

सीबीएसई परीक्षांच्या उर्वरित पेपर्सच्या तारखा घोषित

KJ Maharashtra
KJ Maharashtra


नवी दिल्ली:
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी नवी दिल्लीत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उर्वरित पेपर्सच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार, दिल्लीतील केवळ ईशान्य दिल्ली भागातील दहावीच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या जातील. तर बारावीच्या मात्र, संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. 5 जुलै पासून सुरू होणाऱ्या या सर्व परीक्षा सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत घेतल्या जातील. याआधी5 मे रोजी एका वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा करतांना पोखरीयाल यांनी सांगितले होते की सीबीएसई दहावी आणि बारावीचे उर्वरित पेपर्स1 ते 15 जुलै दरम्यान घेतले जातील. 

परीक्षांच्या तारखा जाहीर करतांना विद्यार्थ्याना तयारी करायला पुरेसा वेळ मिळेलयाची पूर्ण काळजी घेण्यास मनुष्यबळ विकास मंत्रालय कटिबद्ध आहेआता विद्यार्थी आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करु शकतीलअसेही पोखरीयाल यांनी या वेबिनारच्यावेळी स्पष्ट केले होते. याशिवायह्या परीक्षा घेतांना शारीरिक अंतराच्या नियमांचे पूर्ण पालन केले जावेअशा सूचना सीबीएसईला दिल्या आहेतअसेही त्यांनी सांगितले. पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इयत्ता दहावीच्या परीक्षांच्या तारखा बघण्यासाठी इथे क्लिक करा.
इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या तारखा बघण्यासाठी इथे क्लिक करा.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters