News

मुंबई: माजी सैनिकांसाठी पशुसंवर्धन, शेळी पालन, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आदींबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्याचा सैनिक कल्याण विभागाचा मानस असून मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी त्यासाठी दि. 19 जूनपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

Updated on 15 June, 2019 8:34 AM IST


मुंबई:
माजी सैनिकांसाठी पशुसंवर्धन, शेळी पालन, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आदींबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्याचा सैनिक कल्याण विभागाचा मानस असून मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी त्यासाठी दि. 19 जूनपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश माजी सैनिक हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे 'पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय' हा मूळ अथवा जोडधंदा म्हणून त्यांच्या स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय आहे. त्या अनुषंगाने हे प्रशिक्षण आयोजित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

English Summary: Animal Husbandry Training for Ex-servicemen
Published on: 15 June 2019, 08:09 IST