मुंबई
राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तसंच पशुखाद्य दर 25 टक्क्यांनी कमी करावे, असं आवाहन देखील विखे पाटील यांनी पशुखाद्य उत्पादकांना केलं आहे.
यावेळी विखे म्हणाले की, पशुपालन आणि दूध उत्पादन व्यवसायामध्ये पशुखाद्याची गुणवत्ता ही अतिशय महत्वाची बाब आहे. उत्पादित दुधाचे प्रमाण आणि त्याची गुणवत्ता, त्याचप्रमाणे पशुंचे आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमता ही पशुखाद्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
पुढे ते म्हणाले की, बीआयएस परवानाधारक पशुखाद्य उत्पादक संस्थांनीही भारतीय मानक संस्थेच्या प्रमाणकाप्रमाणेच पशुखाद्याचे उत्पादन करावे आणि पशुखाद्याच्या पॅकिंग बॅगवर पशुखाद्यातील अन्नघटकाचे प्रमाण ठळकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
Published on: 18 July 2023, 03:26 IST