सध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून बऱ्याच भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कल्याण-डोंबवली भागातसुद्धा मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे तेथील खाडीच्या पाण्यात वाढ झाली. परिणामी कल्याण पश्चिमेतील दूधनाका आणि परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला.
पावसाचे पाणी परिसरातील घरांमध्ये आणि म्हशींच्या तबेल्यांमध्ये शिरले. त्यामुळे नाईलाजास्तव दुग्ध व्यावसायिकांना आपल्या सर्व म्हशी गोविंदवाडी बायपास उड्डाणपुलावर बांधाव्या लागल्या. हजारो म्हशी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना बांधल्यामुळे बायपास की म्हशींचा तबेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खाडीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
अक्षरशः हे पाणी रेतीबंदर परीसरातील तबेले आणि चाळींमध्ये शिरले. त्यामुळे म्हशी वाचवण्यासाठी दूध व्यावसायिकांना हा जुगाड करावा लागला. दरम्यान, प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी आसपासची अनेक घरं रिकामी करुन घेतली आहेत. पावसामुळे उल्हास नदी तसेच डोंबिवली पश्चिमेकडील खाडी पात्राची पाण्याची पातळी वाढली असून टिटवाळा नजीक असलेला रुंदे पूलही पाण्याखाली गेला आहे.
मात्र ही परिस्थिती केवळ आत्ताची नाही. तर दरवर्षी पावसामुळे या परिसरातील दूध व्यवसायिकांवर अशी परिस्थिती ओढवते. २६ जुलै २००५ साली अति मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरात भयंकर पूर आला होता. त्यावेळीही घरात आणि म्हशीच्या तबेल्यात पाणी शिरले होते. हजारो म्हशी बांधलेल्या तबेल्यात पाणी शिरल्याने त्यांच्या गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
दूध व्यवसायिकांच्या हजारो म्हशी दगावल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. तेव्हापासून खाडी परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जाणवल्यास तेथील दुग्ध व्यवसायिक आपल्या म्हशी गोविंदवाडी बायपास उड्डाणपुलावर आणून बांधतात.
धक्कादायक! ६ हजार कोटी रुपयांच्या सबसिडीचा गैरवापर; खतांचा काळा बाजार उघडीस
शेळ्यांसाठी खतांच्या गोण्यांपासून घरीच तयार केला रेनकोट
पावसापासून प्राण्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी धडपड करत असतो दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राजूर गावात गेल्या काही दहा-बारा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र अशापरीस्थीतही आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शेळ्यांना रानावनात चराईसाठी न्यावे लागत आहे. शेळ्यांचेही वारा आणि पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी चक्क खतांच्या गोण्यांपासून घरीच रेनकोट तयार केला. पहिल्यांदाच शेळ्यांना रेनकोट घालण्याचा प्रयोग पहायला मिळत असल्याने सगळेचजण आश्चर्यचकित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी 'क्रॉपसॅप' योजना ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
ठरलं तर! 'या' तारखेला पार पडणार मंत्रिमंडळ विस्तार
Published on: 14 July 2022, 05:57 IST