News

भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात वेगवेगळी पिके वेगवेगळ्या हंगामात घेतली जातात. भारतात प्रामुख्याने दोन हंगाम असतात एक म्हणजे रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम होय. या हंगामाव्यतिरिक अन्य पिके सुद्धा घेतली जातात म्हणजेच पीक पद्धीमध्ये झालेला बदल, अलिकडच्या काळात फुलशेती आणि फळशेती बक्कळ नफा मिळवून देत असल्यामुळे शेतकरी बांधव फळबागांची लागवड करू लागले आहेत.

Updated on 15 September, 2022 4:45 PM IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात वेगवेगळी पिके वेगवेगळ्या हंगामात घेतली जातात. भारतात प्रामुख्याने दोन हंगाम असतात एक म्हणजे रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम होय. या हंगामाव्यतिरिक अन्य पिके सुद्धा घेतली जातात म्हणजेच पीक पद्धीमध्ये झालेला बदल, अलिकडच्या काळात फुलशेती आणि फळशेती बक्कळ नफा मिळवून देत असल्यामुळे शेतकरी बांधव फळबागांची लागवड करू लागले आहेत.

फळबाग लागवीखाली वाढले क्षेत्र:-
हमखास नफा मिळवायच्या असेल तर फळबागांशिवाय पर्याय नाही हे तेवढंच कर कमी कष्ट करून जास्त उत्पन्न यातूनच मिळू शकते. सध्या राज्यात फळबाग लागवडिखालील क्षेत्र वाढतच चालले आहे या मद्ये प्रामुख्याने आंबा, चिक्कू, पेरू, कलिंगड, केळी पपई या फळांच्या झाडांची लागवड केली जाते. शेतकरी वर्गावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं संकट ओढवले असतेच यामध्ये अतिृष्टीमुळे, दुष्काळ, रोगराई, कीड, वातावरणातील बदल, वादळी गारांचा पाऊस आणि वाढती महागाई या मुळे शेतकरी बांधव नेहमी अडचणीत सापडलेला असतोच

हेही वाचा:-या वयोगटातील महिलांना असतो सर्वात जास्त हार्ट अटॅक चा धोका, जाणून घ्या लक्षणे

आपल्या राज्यात केळी चे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. खानदेश, नाशिक, जामनेर, मुक्ताइनगर या ठिकाणी कुकुंबर मोझॅक हा रोग केळी मध्ये दिसून आला आहे. त्यामुळे रोपे काढून टाकण्याची वेळ बळीराजा वर आलेली आहे.

हेही वाचा:-शेती कामासाठी दिवसेंदिवस भासतेय मजुरांची कमतरता, संशोधन केंद्रात होतेय अवजारांची सातत्यपूर्ण चाचणी

रावेरमधील केऱ्हाळे, दसनूर, अहिरवाडी, वाघोदा बुद्रुक, मुक्ताईनगरमधील नायगाव, अंतुर्ली परिसर, जामनेरातील हिंगणे, पळासखेडा भाग, यावलमधील बामणोद, भालोद, न्हावी, कोचूर परिसर, नंदुरबारच्या शहादामधील ब्राह्मणपुरी, जवखेडा परिसरात सीएमव्ही रोगाचा फैलाव केळी पिकात झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी लागणीसाठी सुरुवातीला प्रति एकर 25ते 30 हजार रुपये खर्च येतो परंतु या रोगामुळे लोकांना बागाच काढून टाकाव्या लागल्या आहेत त्यामुळे करोडो रुपयांच नुकसान झाले आहे.

English Summary: An outbreak of 'Cucumber Mosaic' disease in banana orchards in this part of the state, read in detail
Published on: 15 September 2022, 04:45 IST