जर आपल्याला कुणी सांगितले की आपल्याकडची जुनी 20 रुपयांची नोट (20 rupees note) आपल्याला ऑनलाईन 3 लाख रुपये मिळवून देऊ शकते तर आपला विश्वास बसणार नाही, पण हे खरेच शक्य आहे. अशी अनेक संकेतस्थळे आहेत जिथे आपण आपल्या अनोख्या चलनी नोटा विकून लाखो रुपये कमवू शकता.
ईबे (Ebay), बिडक्युरिओस (BidCurios) अशा ई-वाणिज्य संकेतस्थळांनी (E-commerce websites) आता दुर्मिळ चलनी नोटा आणि नाण्यांच्या लिलावाची (auction) प्रक्रिया सोपी केली आहे. दुर्मिळ नोटा आणि नाण्यांचा संग्रह करण्याची आवड असणारे संग्राहक त्यांच्या संग्रहात भर घालण्यासाठी नेहमीच अशा गोष्टींच्या शोधात असतात.
या क्रमांकाच्या चलनी नोटांकडे ठेवा बारीक लक्ष
जर आपल्याकडच्या 20 रुपयांच्या नोटेचा क्रमांक 786 असा असेल तर आपण या नोटेचा ऑनलाईन लिलाव करून 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता. तसेच आपल्याकडच्या इतरही चलनी नोटांवर काही अनोख्या गोष्टी असतील तर या नोटा आपल्याला एका रात्रीत लखपती बनवू शकतात. या ई-वाणिज्य संकेतस्थळांनी अशा नोटा किंवा नाण्यांचा लिलाव ऑनलाईन करण्यास सुरुवात केल्यामुळे या व्यापारात मोठी वाढ झाली आहे आणि संग्राहक या संधीचा फायदा घेत आहेत.
घरबसल्या फोनवरून कमवा लाखो रुपये
या नोटांपासून पैसे मिळवण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याचीही गरज पडणार नाही. आपल्याला फक्त आपल्या स्मार्टफोनची आणि इंटरनेटची गरज लागेल. यासाठी आपल्याला ईबे, बिडक्युरिओस किंवा क्लिक इंडिया यापैकी एखाद्या संकेतस्थळावर विक्रेता म्हणून नोंदणी करायची आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की क्लिक इंडियावर तर आपल्याला व्हॉट्सअॅपद्वारे थेट विक्री करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
जाणून घ्या नोंदणीनंतर कशी कराल नोटांची विक्री
आपल्याकडच्या 786 क्रमांकाच्या नोटा ऑनलाईन विक्री करण्यासाठी ई-वाणिज्य संकेतस्थळांवर खाते उघडा. विक्रेता म्हणून नोंदणी केल्यानंतर आपल्याकडच्या नोटेचा एक स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचा फोटो काढून संकेतस्थळावर अपलोड करा. तुमची ही पोस्ट पब्लिक केली जाईल आणि ग्राहक आपल्याशी थेट संपर्क साधू शकतील. आपण त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असलेला दर मिळवू शकता. यावेळी आपल्याकडे अनेक ग्राहकांशी सौदा करण्याचा पर्यायही असतो, त्यामुळे आपल्याला आपल्या नोटेची सर्वोत्तम किंमत मिळू शकते.
Published on: 23 July 2021, 09:54 IST