News

मुनावळे पर्यटनस्थळाचा स्थानिकांनी आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा, हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे.

Updated on 06 November, 2023 10:54 AM IST

Satara News : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी नियोजित मुनावळे पर्यटनस्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुनावळे पर्यटनस्थळाचा स्थानिकांनी आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा, हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. हे सर्व करताना सुरक्षेचा संपूर्ण विचार करण्यात आला आहे. निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम आदी सोयीदेखील याठिकाणी करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मासेमारीसाठी स्थानिकांना परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हवाई पाहणी केली.

English Summary: An international standard tourist site will be set up at Munawale in Satara cm eknath shinde
Published on: 06 November 2023, 10:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)