News

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 10 वी, 12वी तसेच व्यवसाय प्रशिक्षणात उत्कृष्ट गुण प्राप्त केलेले विद्यार्थी तसेच पॅराऑलिंपिक खेळामध्ये पदक प्राप्त केलेल्या खेळाडूचा सत्कार मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आज चिल्ड्रेन एड सोसायटी, माध्यमिक शाळा, मानखुर्द येथे करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्याला विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, मुख्याधिकारी बापूराव भवाने, प्रकल्प बालविकास अधिकारी श्रीमती प्रेमा घाटगे, शरद कुऱ्हाडे तसेच इतर अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Updated on 28 June, 2024 2:48 PM IST

मुंबई : महिला व बाल विकास विभागाच्या चिल्ड्रेन एड सोसायटीमधील जे विद्यार्थी उन्हाळी सुट्टीत घरी जाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी शिबिरांचे आयोजन करावे. त्याचप्रमाणे हा उपक्रम राज्याच्या सर्व विभागात राबविण्यात यावा, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 10 वी, 12वी तसेच व्यवसाय प्रशिक्षणात उत्कृष्ट गुण प्राप्त केलेले विद्यार्थी तसेच पॅराऑलिंपिक खेळामध्ये पदक प्राप्त केलेल्या खेळाडूचा सत्कार मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आज चिल्ड्रेन एड सोसायटी, माध्यमिक शाळा, मानखुर्द येथे करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्याला विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, मुख्याधिकारी बापूराव भवाने, प्रकल्प बालविकास अधिकारी श्रीमती प्रेमा घाटगे, शरद कुऱ्हाडे तसेच इतर अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यातील कोकण विभाग आणि विशेषतः दहावी, बारावीतील विद्यार्थिनी ह्या नेहमी परीक्षेत अव्वल असतात, असे सांगून मंत्री कु.तटकरे यांनी सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

English Summary: An initiative to organize summer camps for students who cannot go home during summer vacation should be implemented across the state
Published on: 28 June 2024, 02:48 IST