News

शुभ मुहूर्तावर बाजार समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाळीसगाव बाजार समितीने (Chalisgaon Market Committee) शेतकरी हिताचा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.

Updated on 31 March, 2022 4:39 PM IST

गुढीपाडव्याचा मुहूर्त (Moment of Gudipadva) आणि शेतकरी यांचे सलोख्याचे नाते आहे. याच शुभ मुहूर्तावर बाजार समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाळीसगाव बाजार समितीने (Chalisgaon Market Committee) शेतकरी हिताचा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. बाजार समितीने यंदाच्या गुढीपाडव्याचे मुहूर्त साधत शेतकऱ्यांच्या (Agricultural goods) शेतीमाल मोजण्यासाठी भुईकाट्यावरील फी असते ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी पाढव्यापासून होणार आहे. हा निर्णय छोटा असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या बाजार समितीवर 18 फेब्रुवारीपासून अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Wheat Allergy: गव्हाची चपाती खाल्ल्याने 'या' लोकांना होते अ‍ॅलर्जी, हळूहळू ही लक्षणे जीव घेतील!
पठ्याने! आता तर हद्दच केली; अंगणातच लावले गांजाचे झाड

बाजार समितीच्या या निर्णयामुळे 6 लाखाचे उत्पन्न मिळणार नाही. पण प्रशासनामधील सर्वांच्या मंजूरीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर ताण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारची फी माफ म्हणजे एक प्रकारे उत्पन्नात वाढ असल्यासारखेच आहे. पाडव्याचे मुहूर्त साधत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
खरीप हंगामातील खतांच्या संकटावर मात करण्यासाठी कृषी विभाग उतारले मैदानात
जिल्हा बॅंकेने कर्जमर्यादा वाढवली; आता शेतकऱ्यांना एकरी मिळणार 'इतके' वाढीव कर्ज
ऊसाचा राडा काय संपेना; हंगामाच्या अंतिम टप्प्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटणार

English Summary: An important decision was taken by the market committee on the occasion of Gudipadva
Published on: 31 March 2022, 04:39 IST