News

शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे (Agriculture) उत्त्पन्न वाढवण्यासाठी अनेक नवनवे तंत्रज्ञान (Technology) विकसीत केले जात आहे. 11वीच्या विद्यार्थिनीनं शेतात पाणी देण्यासाठी सोलर सायकल बनवली आहे.

Updated on 24 July, 2023 7:17 AM IST

शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे (Agriculture) उत्त्पन्न वाढवण्यासाठी अनेक नवनवे तंत्रज्ञान (Technology) विकसीत केले जात आहे. 11वीच्या विद्यार्थिनीनं शेतात पाणी देण्यासाठी सोलर सायकल बनवली आहे.

बंगळुरू येथील रचना बोडागू या इयत्ता 11 वीच्या विद्यार्थिनीने ही सोलर सायकल बनवली आहे. या मुलीचे नाव रचना आहे. शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक पद्धतीने पाणी उपसण्यासाठी मदत करण्याचे स्वप्न पाहिलं होतं. आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी रचनाने सोलर सायकल (Solar Cycle) तयार केली आहे, ज्याच्या मदतीने किसान सोलर वॉटर पंपाद्वारे (Irrigation Technique) सहज ऊर्जा वापरून करता येते.

रचना म्हणाली की, सुरुवातीला मी आनंद मल्लिगवाड यांच्यासोबत कोमसंद्रामध्ये एका तलावाचे पुनरुज्जीवन केले. येथे 2000 रोपे लावून एक छोटेसे जंगलही बनवलं. त्यांना रोज पाणी देणं हे खूप कष्टाचं काम होतं. म्हणूनच मी एक इको फ्रेंडली सोलर साइकल (Eco friendly Solar Cycle) तयार केली आहे. जेणेकरून रोपांना सहजरित्या पाणी देता येईल.

किती खर्च झाला?

रचनाने वस्तू गोळा करण्यासाठी जस्ट डायल आणि इंटरनेटवरून लोक शोधून लोकांशी संपर्क साधला. मधुसूदन नावाच्या माणसाने त्याला सोलर पॅनल आणि पाण्याचा पंप दिला. आणि तिने इंडियामार्टकडून एक सायकलही विकत घेतली. मग लोकांच्या मदतीने आणि या सर्व वस्तू जोडून सायकल तयार केली.

रचनाला ही सोलर सायकल बनवण्यासाठी एक लाख रुपये खर्च आला आहे. त्यासाठी तिने आपली बचत वापरली. आता रचनाला सीएसआर (CSR) फंडाच्या मदतीने अशा अनेक सायकल बनवायची ऑफर आली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत तिची (Eco friendly Solar Cycle) पोहोचू शकेल.

रचना म्हणाली की, ‘बंगळुरूजवळ राहणार्‍या शेतकर्‍यांना सहसा रात्री वीज मिळते. याचा अर्थ त्यांना रात्री त्यांच्या मोठ्या शेतात पाणी द्यावे लागते. हे खूप जोखमीचे काम आहे. मला ही सौर सायकल (Solar Cycle) फायद्याची आहे. जेणेकरून शेतकरी दिवसभर त्याचा वापर करू शकतील आणि त्यांना इंधन आणि विजेवर अवलंबून राहावे लागणार नाही.

English Summary: An 11th grader made a solar bicycle to irrigate a field
Published on: 30 May 2022, 10:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)