News

देशासह राज्यात कोरोना व्हायरस (covid-19) मुळे उद्योग बंद आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या नोकरीची आणि मिळणाऱ्या वेतनची चिंता आहे. अशा चिंतेत मात्र अमूल कडून शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी हाती आली आहे. अमूल(Amul) ने शेतकऱ्यांचे पेमेंट केले असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात २०० कोटी रुपयांचे पेमेंट अदा केले आहे.

Updated on 07 April, 2020 11:22 AM IST

 

देशासह राज्यात कोरोना व्हायरस (covid-19) मुळे उद्योग बंद आहेत.   यामुळे नागरिकांना आपल्या नोकरीची आणि मिळणाऱ्या वेतनची चिंता आहे. अशा चिंतेत मात्र अमूल(Amul) कडून शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी हाती आली आहे.  अमूल(Amul) ने शेतकऱ्यांचे पेमेंट केले असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात २०० कोटी रुपयांचे पेमेंट अदा केले आहे. राज्यातील डेअरी व्यवसाय अतिशय बिकट अवस्थेतून वाटचाल करत आहे. मात्र अमूलचा विकास हा अनेकांच्या भुवया उंचावणाऱा आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात येत आले आहे.

यामुळे दुधाला मागणी नसल्याचे सांगून राज्यातील संकलकांनी शेतकऱ्यांच्या दुधाचे खरेदी दर १८ ते २२ रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान अमूल मात्र २५ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर देत आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर २८ ते २९ रुपये तर म्हशीच्या दुधाला ४० ते ४२ रुपये दर दिला जातो आहे. मंदी सांगितली जात असली तरी अमूलकडून १७ लाख लिटर दुधाची खरेदी सुरळीतपणे चालू आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या चांगल्या दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी अमूलने सध्या ११०० दूध संकलन केंद्रे उभारली आहेत. दीड लाख शेतकऱ्यांचे दूध जमा करण्यासाठी मुंबईत सहा तर पुणे, औरंगाबाद, व नागपूरला प्रत्येकी एक असे ९ प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे संकलित केलेले १६ ते १७ लाख लिटर दूध पुन्हा पिशवीबंद करुन राज्यामध्येच विकण्याचे तंत्र अमूल ने ठेवले आहे. राज्याच्या दुग्ध व्यवसायात शेतकऱ्याला पादर्शकता आणि गुणवत्ता अशा दोन्ही पातळ्यांवर अमूलने मोठा आधार दिला आहे.

English Summary: amul paid 200 crore to farmer in rescission
Published on: 07 April 2020, 10:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)