News

नवी दिल्ली- सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच देशव्यापी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतासह विदेशातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी होणार आहे. सहकार मंत्री अमित शाह यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated on 25 September, 2021 4:48 PM IST

नवी दिल्ली-  सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच देशव्यापी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतासह विदेशातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी होणार आहे. सहकार मंत्री अमित शाह यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशातील सहकारी क्षेत्रास जागतिक स्तरावर संधी प्राप्त करून देणे आणि सहकारास बळकटी प्राप्त करणे हा संमेलनाच्या आयोजनामागील उद्देश आहे. सहकार मंत्रालयाने संमेलनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ट्विटरवर जाहीर केली आहे.

सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह हे पहिल्यांदाच देशभरातील सहकारी संस्थांना संबोधित करणार आहेत. इफ्को, सहकार भारती, नाफेड, कृभको  आदी देशभरातील संस्थांनी सहकार संमेलनाच्या आयोजनात भूमिका बजावली आहे. देशभरातील सुमारे दोन हजार प्रतिनिधी संमेलनास उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.

स्वतंत्र सहकार मंत्रालय:

'सहकारातून समृद्धी' हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच स्वतंत्र मंत्रालय बनवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या मंत्रालयाची घोषणा केली होती.

नव्या मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासकीय, कायद्यांचा आणि धोरणात्मक रचना उपलब्ध केली जाईल. सहाकरी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी कामी येईल.

सहकारी संस्थांचे आयोजन

इफको, नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरशेन ऑफ इंडिया, अमूल, सहकार भारती, नाफेड, कृभको आणि इतर संस्थांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष एरिअल गार्को हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

अमित शाह काय बोलणार?

सहकार मंत्री अमित शाह यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहकार मंत्रालयाचा पहिलाच सार्वजनिक मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात अमित शाह केंद्रीय सहकार मंत्रालयासंदर्भातील भूमिका आणि भविष्यातील वाटचाल यांसदर्भात महत्वाचं सूतोवाच करण्याची शक्यता आहे.

सहकार धोरणाची स्पष्टता:

सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींना या निमित्तानं पहिल्यांदा केंद्रीय सहकारमंत्र्यांची भूमिका समजून घेता येणार आहे. केंद्र सरकारचं सहकार क्षेत्रासंदर्भातील धोरण देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हे संमेलन भारताच्या सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका ठरणार आहे.

English Summary: amit shah to adress convention in delhi
Published on: 25 September 2021, 04:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)