News

आपल्याला माहित आहेच कि,गावातील सहकारी सोसायटी आणि शेतकऱ्यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा पतपुरवठा बहुतांशी सहकारी सोसायटीमार्फत केला जातो.या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कृषी सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो काही अल्पमुदतीचा पतपुरवठा होतो

Updated on 10 September, 2022 7:13 PM IST

 आपल्याला माहित आहेच कि,गावातील सहकारी सोसायटी आणि शेतकऱ्यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा पतपुरवठा बहुतांशी सहकारी सोसायटीमार्फत केला जातो.या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कृषी सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो काही अल्पमुदतीचा पतपुरवठा होतो

 त्यासोबतच आता मध्यम आणि दीर्घकालीन पतपुरवठासाठी केंद्रस्तरावर धोरणात्मक विचार सुरू असून येणाऱ्या दोन महिन्यात बियाणे संवर्धन तसेच जैविक उत्पादनांचे विपणन आणि प्रमाणीकरणासाठी बहुराज्यीय सहकारी संस्था स्थापन केली जाईल अशी घोषणा सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या संमेलनात गुरुवारी केली.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो किसान क्रेडिट कार्ड मिळवा घरबसल्या; जाणून घ्या सोपा मार्ग

या संमेलनात त्यांनी सहकार चळवळीला पुढे नेण्यासाठी एक निश्चित दिशा आणि धोरण आवश्यक असून सहकार क्षेत्राच्या विकासासाठी टीम इंडियाच्या भावनेतून सगळ्यांना काम करावे लागेल असे आवाहन केंद्रीय सहकारिता मंत्री श्री.अमित शहा यांनी केले.

यावेळी त्यांनी कृषी सहकारी सोसायट्या या बहुउद्देशीय बनवण्याचे आवाहन करताना एकही कृषी सहकारी सोसायट्या नसलेली गावे शोधण्यात यावीत असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये कृषी सहकारी सोसायट्यांची संख्या तीन लाखांवर नेण्याचा सहकार मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा:माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खतांच्या वापराबाबत,परसबागेबाबत मार्गदर्शन

कृषी सहकारी सोसायटीमार्फत होईल दीर्घकालीन पतपुरवठा

मोदी सरकारच्या सहकार धोरणांमध्ये संगणकीकरण,निशुल्क नोंदणी तसेच लोकशाही पद्धतीने निवडणूक,सक्रिय सदस्यता, कामकाजात तसेच नेतृत्वामध्ये व्यावसायिकपणा, पारदर्शकता जबाबदारी यावर भर राहील असे सांगताना  कृषी सहकारी सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना अल्प मुदती सोबतच मध्यम आणि दीर्घ कालीन पतपुरवठा करता येईल काय याबाबत सरकारच्या पातळीवर धोरणात्मक विचार सुरू आहे.

नक्की वाचा:केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तांदळाची निर्यात महागली

English Summary: amit shah says about long term financial supply to farmer by cooperative society
Published on: 10 September 2022, 07:13 IST