कधीकधी निसर्गामध्ये अशा काहीतरी घटना घडतात ती त्या पाहून किंवा ऐकून विश्वास बसत नाही. अशा घटना ऐकून किंवा पाहून अक्षरशा व्यक्ति थक्क होते.
आणि अशा गोष्टींना निसर्गाची कृपा किंवा दैवी देणगी म्हणून एक लेबल लावले जाते. कारण अशा घटना या विचारशक्तीच्या पलीकडे देखील असतात. अशीच एक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शिरपूर तालुक्यातील अपेक्षा खंबाळे या गावचे शेतकरी भीमसिंह भुरा पावरा त्यांच्या बाबतीत घडली. तीन वर्षांपूर्वी त्यांची कुपनलिका बंद पडली आणि सगळे काही थांबल्यासारखं झाले होते. त्यामुळे ते चिंताग्रस्त असताना त्यांनी त्यांचे अर्धे शेत गहाण ठेवले व दुसरी नवी कूपनलिका खोदली. परंतु झाले असे की नवी कूपनलिका खोदताना बंद कूपनलिका ला संजीवनी मिळाली व या बंद कूपनलिकेत तुन साठ फूट उंच पाण्याची कारंजी उसळली. शिरपूर पॅटर्न सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. देशातील जलसंधारणातील यशस्वी प्रयोग म्हणून याकडे पाहिले जाते. याचाच फायदा भिमसिंग पावरा यांना मिळाला.
गावालगत त्यांची तीन एकर शेती असून त्यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यात खोलीकरण, रुंदीकरण होऊन शिरपूर पॅटर्न बंधारा करण्यात आला व या बंधाऱ्यामध्ये पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यात आले आहे. पावरा यांच्या शेतातील हे कूपनलिका जवळजवळ तीन वर्षापासून बंद पडली होती. दरम्यान त्यांनी बंधाऱ्यातून पाणी उपसून काही दिवस शेती केली. आता कडक उन्हाळा असल्याने पाण्याने तळ गाठला. त्यामुळे त्यांच्या समोर पाण्याचे संकट उभे राहिले व पाण्याचा दुसरा पर्याय शोधल्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर नव्हते. दुसरी कूपनलिका खोदायची म्हणजे पैसे लागतील व त्यांना पैशांची खूप अडचण होती. म्हणून त्यांनी दीड एकर शेत गहाण ठेवली व सव्वा लाख रुपये उसने घेतले व अगोदरच्या बंद पडलेल्या कूपनलिकेचे शेजारीच नवी कूपनलिका खोदायला घेतली. नव्या कूपनलिकेचे खोदकाम सुरू असताना दोन तासानंतर बंद कूपनलिकेतून पाण्याचा प्रवाह जोरात बाहेर पडू लागला. त्यामुळे त्यांनी या बंद पडलेल्या कूपनलिकेच्या तोंडावरील माती बाहेर काढली व प्रचंड वेगाने पाणी उसळले.
अक्षरशा 60 ते 70 फुटापर्यंत ही पाण्याने उसळी घेतली. हे सगळे दृश्य पाहून सगळे जण थक्क झाले. परंतु या शेतकरी राजाच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू उभे राहिले. कारण अंगाचा लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात दोन्ही कूपनलिकांना पाणी लागल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.(स्रोत-ऍग्रोवन)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री यांच्याकडून पशुंच्या अत्याधुनिक प्रजनन तंत्रज्ञानावर भर
Published on: 29 April 2022, 02:55 IST