जालना जिल्ह्याची पहिल्यापासूनच मोसंबीची आगार म्हणून ओळख आहे. जालना मधील शेतकऱ्यांनी मोसंबीला जीआय नामांकन मिळवून दिले आहे मात्र फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी त्यांची राजकीय ताकद वापरून सिस्ट्रस इस्टेट केंद्र पैठण नेहल्यामुळे जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
पूर्ण मराठवाडा विभागाचा जर विचार केला तर सर्वात जास्त मोसंबी उत्पादक एकट्या जालना जिल्ह्यातून आहेत. मराठवाडा मध्ये मोसंबी चे एकूण क्षेत्र ४० हजार हेक्टरवर आहे त्यामधून एकट्या जालना जिल्हयात २९ हजार ५२५ हेक्टरवर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते आणि त्यामध्येच तेथील शेतकऱ्यांनी जीआय नामांकन प्राप्त केले जे की बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्र देखील आहे. सिस्ट्रस केंद्र जालना येथील बदनापूर मोसंबी केंद्रात झाले असते तर याचा फायदा शेतकऱ्याना अधिक झाला असता असे शेतकऱ्यांचे मत होते मात्र फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी ते केंद्र पैठण हलवल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
पैठण तालुक्यामध्ये फक्त उत्तरेच्या बाजूला ५-७ हजार हेक्टरवर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते मात्र याबाबतीत जालना जिल्हा विक्रमी उत्पादन घेतो. पैठण येथे घेऊन गेलेल्या सिस्टस केंद्रात उच्च दर्जाची रोपवाटिका तयार केली जाणार आहे तसेच उच्च दर्जाचे कलम करून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. ग्रेडिंग असो किंवा पॅकेजिंग इ. सर्व या केंद्रात होणार असून मोसंबी निर्यात वाढीला चांगल्या प्रकारे चालना भेटणार आहे. या केंद्रासाठी १५ डिसेंम्बर रोजी जी बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये ३६ कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे.
जालना हे मोसंबी उत्पादनाचे आगार असून सुद्धा राजकीय जोरावर सिस्टस केंद्र पैठण हलविले आहे यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याने आक्षेप घेतला नाही हीच सर्वात चकित करणारी गोष्ट आहे. सिस्टस केंद्र हे पैठण मध्ये होत असल्याने रावसाहेब दानवे यांनी दुर्लक्ष केले आहे कारण पैठण चा मतदारसंघ हा जालना मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे नेते सुद्धा गप्प आहेत कारण संदीपान भुमरे हे शिवसेनेचे मंत्री असून जालना मधील सर्वच नेत्यांच्या ओळखीचे आहेत. या एकमेकांच्या राजकीय ताकदिमुळे शेतकरी नाराज आहेत.
Published on: 28 December 2021, 12:17 IST