News

सध्या राज्यात काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काही भागात पावसाने शेतकऱ्यांना चांगलीच साथ दिली आहे. मात्र काही भागात पावसाने असं काही आक्रमक रूप धारण केले आहे की, यात सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचेच झाले आहे.

Updated on 27 June, 2022 6:00 PM IST

नांदेड : सध्या राज्यात काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काही भागात पावसाने शेतकऱ्यांना चांगलीच साथ दिली आहे. मात्र काही भागात पावसाने असं काही आक्रमक रूप धारण केले आहे की, यात सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचेच झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा नांदेडकरांना चांगलीच प्रचिती आली आहे. या जिल्ह्यात पिकांना पाणी देण्याची नामुष्की झाली होती मात्र क्षणाधार्थ वेळ बदलली आणि आता हीच पिके पाण्यात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी जांभळा शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे जागोजागी पाणी साचले. परिणामी पिके उगवताच पंचनामे करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मुसळधार पावसामुळे जमिनीत गाढलेले बियाणे वाहून गेले आहे. तर दुसरीकडे उगवलेल्या पिकात पाणी साचले आहे. जांभळा शिवारात तर शेतजमिनीच खरडून गेल्या आहेत. आधीच पाऊस लांबणीवर गेला त्यात आता उशिरा सुरु झालेला पाऊस काळ बनून आल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

'या' पिकांचे झाले नुकसान
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाऊस नसतानाही धूळपेरणीचा प्रयोग केला होता. यामध्ये हळद, कापूस तसेच काही क्षेत्रावर सोयाबीनचाही प्रयोग करण्यात आला होता. पाऊस वेळेत आणि प्रमाणात पडला असता तर हा प्रयोग यशस्वी झाला असता. मात्र ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे कष्ट आणि बियाणेही पाण्यात गेले आहे. या भागातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते मात्र काही मंडळात पावसाने थैमान घातले. त्यामुळे पेरलेल्या तसेच उगवलेल्या
पिकांचेही बरेच नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी पंचनामे करुन मदतीची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:
रेल्वे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार; शेतकऱ्यांची १५० एकर शेती पाण्यात
शेतकऱ्याने विहिरीतच घेतला गळफास; शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार कधी सोडवणार

English Summary: Although it rained, due to 'this' reason, the crisis of double sowing on the farmers
Published on: 27 June 2022, 04:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)