News

यावर्षी सुरुवातीलाच पावसाने मोठा खंड दिला. या दरम्यान नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात झाल्या आणि परिणामी कीड आणि रोगांमुळे होणारे नुकसान कमी झाले.

Updated on 29 August, 2021 3:19 PM IST

 यावर्षी सुरुवातीलाच पावसाने मोठा खंड दिला. या दरम्यान नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात झाल्या आणि परिणामी कीड आणि रोगांमुळेहोणारे नुकसान कमी झाले.

याचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची व कोबी सह इतर भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

 नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती चा विचार केला तर येथून भाजीपाला हा वाशी, आमदाबाद, सुरत आणि भोपाल सह दिल्लीपर्यंत जात असतो

 मात्र यावर्षी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतसगळ्याच प्रकारच्या भाजीपाल्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने तसेच पुरवठ्याच्या मर्यादा असल्याने कमी दरात खरेदी होत असल्याची स्थिती आहे टोमॅटो चा विचार केला तर टोमॅटोची आवक अतिशय मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः जवळचे पदरमोड करून शेतमाल विकण्याची वेळ आली आहे. तसेच इतर राज्यातून व जिल्ह्यांमधून मुंबईत शेतमाल मोठ्या प्रमाणावर येत आहे तसेच इतर राज्यातून व जिल्ह्यांमधून मुंबईत शेतमाल मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे नाशिक बाजारातून मागणी तुलनेत कमी वआवक वाढल्याने दर घसरले. सध्या सगळ्याच प्रकारच्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

दोडका, काकडी भोपळ्याचे दर थोड्या प्रमाणात कोण आहेत परंतु टोमॅटो, ढोबळी मिरचीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. टोमॅटोला प्रति किलो सात ते आठ रुपयांपर्यंत दर असताना ते तीन ते चार रुपयांवर आले आहेत. ढोबळी मिरची 15 ते 16 रुपये प्रति किलो असताना आताचे दर सहा ते सात रुपये प्रति किलो आहेत. कोबी तीन ते चार रुपये प्रति किलो, कारले चार ते पाच रुपये किलो  असे सध्याचे दर आहेत. तसेच कोथिंबीर आणि शेपूच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

English Summary: all vegetable rate go down because plenty supply
Published on: 29 August 2021, 03:19 IST